Homeटॉप स्टोरीमुंबई महापालिकेची सॅप...

मुंबई महापालिकेची सॅप प्रणाली ११ ते २८ जून बंद!

मुंबईकर नागरिकांना अद्ययावत व गुणवत्‍तापूर्ण नागरी सेवा-सुविधा पुरविण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका वापरत असलेली ‘सॅप मूलभूत’ प्रणाली आता ‘सॅप हाना’ या अद्ययावत आवृत्‍तीमध्‍ये अद्ययावत करण्‍यात येणार आहे. या कामकाजासाठी सॅप मूलभूत प्रणाली ११ जून २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून ते २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

मुंबई महापालिका नागरिकांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वोत्तम व तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नांचा भाग म्हणून महानगरपालिकेने नागरिक, कंत्राटदार तसेच महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध कामकाजासाठी सॅप या मुलभूत सॉफ्टवेअर प्रणालीचा अंगीकार केला आहे.

सॅप प्रणाली अद्ययावत व सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच सर्वोत्‍तम सेवा देता यावी, यासाठी महापालिकेने सॅप हाना या अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्‍वीकार करण्‍याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्‍या वापरात असलेली सॅप मूलभूत प्रणाली ही सॅप हाना या नवीन व अद्ययावत अशा आवृत्‍तीमध्‍ये स्थलांतरित करणे आवश्यक आहे. 

सॅप हाना या नवीन प्रणालीमध्ये दस्तऐवज साठवण्याची सुविधा, नवीन एप्लिकेशन्स अधिक जलदरीत्या तपासून कार्यान्वित करणे, अधिक जलद वेगाने प्रक्र‍िया करणे, नवीन यूजर इंटरफेस, अधिक प्रतिसादात्मक व वापरण्यास सुलभ मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि विविध प्रकारचे डॅशबोर्ड उपलब्ध आहेत.

या अद्ययावत लाभांसाठी सध्या कार्यान्वित असलेली सॅप प्रणालीचे सर्व्हर्स बंद करून त्याचे सॅप हाना प्रणालीवर स्‍थानांतरासह अद्ययावतीकरण केले जाणार आहे. सध्याच्या क्लाउड सेवांचा कंत्राट कालावधी संपणार असल्याने महापालिकेची संगणक प्रणाली नवीन क्लाउडवर स्थलांतरित करण्याचे कामकाजही या कालावधीमध्येच करण्यात येणार आहे.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिकेला सॅप प्रणाली ११ जून २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून ते २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवावी लागणार आहे. संपूर्ण सॅप प्रणाली बंद ठेवण्यात येणार असल्याने या कालावधीत नागरिक व कर्मचारी सॅप प्रणालीवरील कोणतेही व्यवहार जसे की, नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा, कार्यादेश देणे, अधिदान करणे इत्यादी कामकाज करू शकणार नाहीत.

मात्र, महापालिकेच्या सॅप प्रणाली व्यतिरिक्त इतर सेवा नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी https://ptaxportal.mcgm.gov.in, जलदेयकांचा भरणा करण्याकरिता https://aquaptax.mcgm.gov.in, ऑनलाईन इमारत बांधकाम परवानगी अर्जासाठी https://autodcr.mcgm.gov.in ही संकेतस्‍थळं सुरू राहणार आहेत.

महापालिकेमार्फत मागविल्या जाणाऱ्या निविदा महाराष्ट्र शासनाच्या इ-टेंडरिंग प्रणालीवर मागविल्या जाणार असल्याने निविदा प्रक्रियादेखील सुरू राहणार आहेत. उपरोक्त कालावधीमध्ये सॅप मूलभूत प्रणाली बंद राहणार असल्‍याने आवश्‍यक कामकाज त्‍वरित पूर्ण करुन मुंबईकर नागरिक, कंत्राटदार तसेच कर्मचारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content