Homeडेली पल्सनिवृत्तीवेतन प्रणालीच्या सुधारित...

निवृत्तीवेतन प्रणालीच्या सुधारित संकेतस्थळाचे अनावरण!

निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) चे अध्यक्ष डॉ. दीपक मोहंती यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ट्रस्टच्या सुधारित संकेतस्थळाचे नुकतेच अनावरण केले. पीएफआरडीएचे पूर्ण वेळ सदस्य प्रा. मनोज आनंद आणि ममता शंकर, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ट्रस्टचे अध्यक्ष सूरज भान हे देखील यावेळी उपस्थित होते.

नवीन संकेतस्थळ https://npstrust.org.in एनपीएस ट्रस्टच्या वापरकर्त्याचा अनुभव समृद्ध करण्याच्या आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना (एपीवाय) शी संबंधित माहितीचा अखंड प्रवेश प्रदान करण्याच्या वचनबद्धतेमध्ये महत्वाचा टप्पा आहे.

नवीन संकेतस्थळाची रचना आकर्षक माहितीपूर्ण असून डेस्कटॉप आणि मोबाइल दोन्ही उपकरणांसाठी ती उपयुक्त आहे.

संकेतस्थळ हिंदीमध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एनपीएस ट्रस्ट आपल्या हितधारकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी त्याच्या सेवा आणि डिजिटल उपक्रमांमध्ये आणखी वाढ करण्यासाठी वचनबद्ध आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content