Homeचिट चॅटकान्हेरी लेण्यांच्या सौंदर्यावर...

कान्हेरी लेण्यांच्या सौंदर्यावर जी-20 देशांचे प्रतिनिधी भारावले!

मुंबईतल्या कान्हेरी लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य, नीरव शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून    जी-20 देशांचे प्रतिनिधी आज अक्षरशः भारावले.

जी-20 देशांच्या प्रतिनिधींची 13 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुंबईत परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या शेवटच्या दिवशी जी-20 प्रतिनिधींसाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील प्रसिद्ध कान्हेरी लेण्यांना भेट देऊन या स्थळांची माहिती व इतिहास जाणून घेतला.

बोरीवलीजवळील साष्टी बेटाच्या अरण्यात कान्हेरी लेणी आहेत. या लेण्यांचा इतिहास, ‘कान्हेरी’ या शब्दाचा उगम कशाप्रकारे झाला. या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते. हा परिसर अत्यंत शांत आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे.  त्यामुळे या भागात अनेक पर्यटक भेट देत असतात, अशी माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाने यावेळी जी-20 च्या प्रतिनिधींना दिली.

या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खूंसाठी विहार, सभागृह, खोल्या. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्ती, डोंगरमाथ्यावर पाण्याची टाकी यावेळी सर्वांनी पहिल्या. गुंफा पूर्ण झाली की त्यांचे परिवर्तन विहारामध्ये होई आणि तेथे बौद्धधर्मीय विविध उपक्रम राबवत. बहुतेक गुंफांचा वापर बौद्धधर्मीय श्रमण यांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी आणि ध्यानासाठी करीत. मोठ्या गुंफांमधून परिषदा भरविल्या जातात. तसेच तेथे स्तूप आहेत. त्यामुळे तेथे प्रार्थना करण्यासाठीही त्यांचा वापर केला जाई. बौद्ध संघातील जीवनात काय हवे आहे, याबद्दलचे मार्गदर्शन बहुतेक विहारातील मठाधीश देत असत, अशा अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा देत कान्हेरी गुंफाच्या निर्मितीपासूनचा इतिहास परिषदेतील प्रतिनिधींना देण्यात आली.

सुवाच्य अक्षरातील शिलालेख आणि वचननामे (एपिग्राफ्स) ही ब्राह्मी, देवनागरी आणि पहलवी या तीन लिप्यांत आहेत. येथे अनेक लहानमोठे धबधबे आहेत. सध्या रिकामे ओहोळ पूर्ण कोरडे आहेत. मात्र पाण्याचा प्रवाह किती मोठा असू शकतो याच्या खुणा येथे लक्षात येतात. संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे मुख्य गेट ते कान्हेरी गुंफा हा रस्ता एका नदी पात्राने विभागलेला आहे. हा परिसर पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो.

भारतीय शास्त्रीय संगीताचा घेतला आस्वाद

तुळशी तलाव येथे वन विभागाच्या निवासव्यवस्था असलेल्या ठिकाणी केंद्रीय पर्यटन विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तबलावादन, पखवालवादन आणि शास्त्रीय संगीत सहभागी कलाकारांनी सादर केले. बासरीवादक देबो प्रिया, सुश्मिता चॅटर्जी, कलिनाथ मिश्रा आणि मृणाल मिश्रा यांनी भारतीय संस्कृतीतील विविध सुप्रसिद्ध गाण्यांवर बासरी वादन केले.

Continue reading

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...
Skip to content