Homeडेली पल्सउपसभापतीपदावरून डॉ. नीलम...

उपसभापतीपदावरून डॉ. नीलम गोऱ्हे यांना हटवा!

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.

आज परिषदेच्या सभागृहात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हा घटनात्मक पेच सोडवावा यासाठी नंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या ४० आमदारांचा समावेश होता. डॉ. नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदावरून हटवा, अशी मागणी आम्ही केली असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. ऍड. जनरल यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच हा पेच सुटेपर्यंत त्यांनी समिती नेमावी आणि कामकाज चालवावे, अशी मागणीही आम्ही केल्याचे दानवे यांनी सांगितले.

नीलम

विधान परिषदेत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करत डॉ. नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. पक्षांतर केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व आपोआपच रद्द होते. आणि सभापती नसल्यामुळे यावर निवाडा कोण करणार, असा सवालही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हल्ला परतवताना नोटीस दिल्याशिवाय हा मुद्दा उपस्थित करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी आज विधानमंडळ सचिवांकडे डॉ. नीलम गोऱ्हे, विप्लब बाजोरिया तसेच प्रा. मनीषा कायंदे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली. यावर काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content