Homeमुंबई स्पेशलधर्मानुरागी जिनमती शाह...

धर्मानुरागी जिनमती शाह यांचे निधन

धर्मानुरागी जिनमती शाह यांचे काल मुंबईतल्या प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, स्नुषा, नातवंडे आदी मोठा परिवार आहे. जिनमती यांच्या पार्थिवावर दादर, शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी, प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, ब्रिच कॅंण्डी, ताडदेव परिसरातील उद्योजक, साहित्यिक, व्यापारी आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

जिनमती यांचे पुढील बेस्ना, उठामणा आदी तत्सम कार्यक्रम होणार नाहीत. त्या बारामतीतील प्रसिद्ध शेठ चंदुकाका सराफ यांची कन्या, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका बीना शाह यांच्या मातोश्री तसेच फलटणचे धनाढ्य व्यापारी व जैन समाजाचे आधारस्तंभ चंदुलाल शाह यांच्या पत्नी होत. मुंबईतून प्रसिद्ध होणारी अनेक दैनिक, साप्ताहिके व पाक्षिकांची छपाई त्यांच्या वरळीतील छपाई कारखान्यात केली जात असे. बोरीवली, संजय गांधी उद्यानातील पोदनपुरा या जैन मंदिराचे त्या संस्थापक विश्वस्त होत्या. त्यांनी काही एकर जमीन मंदिरास दानही केली आहे.

Continue reading

के. रवि दादांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते के. रवि (दादा) यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्याच अंदाजात, सर्व स्तरातील लोकांसोबत मुंबईत अरबी समुद्रात, गेट वे ऑफ इंडियावर ताज पॅलेस हॉटेलसमोर एका बोटीवर नुकताच साजरा केला. या वाढदिवस सोहळ्यात 'भाभी जी घर पर हैं'...

मुंबई विमानतळावर सायबर अटॅकच्या अफवा

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी सायबर अटॅक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, विमानतळ प्रशासनाने ती अफवा असल्याचे सांगत हा केवळ तात्पुरता नेटवर्क बिघाड असल्याचे स्पष्ट केले. विमानतळाच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7.05...

राजीव श्रीखंडे यांनी लिहिलेल्या ‘ग्लोबल साहित्यसफर’चे प्रकाशन

प्रसिद्ध लेखक राजीव श्रीखंडे यांच्या ‘ग्लोबल साहित्यसफर (भाग ३)’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतल्या दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा (पश्चिम) येथे नुकतेच झाले. कार्यक्रमाला ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील तसेच शिक्षणतज्ज्ञ, लेखिका व भाषांतरकार डॉ. अंजली पटवर्धन-कुलकर्णी...
Skip to content