रामनवमीचा सोहळा काल महाराष्ट्रभर उत्साहात पार पडला. नाशिकमधील काळा राम मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली होती. राम जन्मला ग बाई..च्या सुरात दुपारी श्री प्रभू रामाचा

जन्मोस्तव उतहासात पार पडला. मुंबईतील वडाळा येथील राम मंदिर आणि विलेपार्ले (पूर्व) येथील मद्रासी राम मंदिरातही रामनवमी मोठ्या उत्सहात साजरी झाली. याप्रसंगी परंपरेनुसार पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.
