Homeचिट चॅटबिग बॉस मराठीत...

बिग बॉस मराठीत आज आदिश व सोनालीत होणार वाद!

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वादाला सुरूवात झाली की सदस्य थांबायचं नावच घेत नाहीत. किचन एरियामध्ये स्वयंपाक बनवताना असो वा जेवताना, भांडण करू नका, वाद करू नका, शक्यतो ते टाळा.. असे अनेकवेळा सांगूनही सदस्य काही सुधारायचे नाव घेत नाही. शब्दाला शब्द वाढत जातो आणि वाद अजून अजून वाढतो. असं काहीसं आज आदिश आणि सोनालीच्या बाबतीत होणार आहे. काल सोनालीचा भात वाफवण्यावरून तृप्तीताईंशी वाद झाला आणि आज चपाती बनवण्यावरून आदिशसोबत वाद होणार.

बिग बॉस

सोनाली विचारते की, “बाकीची लोकं उभं राहिली आहेत त्यांच्यासाठी… त्यावर आदिशचं म्हणणं आहे, “आता जाऊ देना ती (गायत्री) करते आहे ना… ती लाटते आहे, तिला लाटू दे तिच्या पद्धतीने.. त्यावर सोनाली म्हणते, मी कुठे नाही म्हणाले…  आदिश म्हणतो, मी फक्त सांगतो आहे.. म्हणून तुला विचारलं तू पूर्ण लाटणार आहेस का? आणि इथून वादाला सुरुवात होते.

सोनाली म्हणते, तू सांगू नकोस मला.. मी तुला विचारूनच तिथे उभी राहिली. गायत्री म्हणते- तू मला नाही विचारलं. आदिश त्याचं मत मांडत होता. तेव्हा सोनाली आदिशला म्हणते- तू हे मगाशीच बोलायचं होतंस, मघाशी बोललास का तू? तुला माहित नव्हतं, मग मघापासून काय ऐकतो आहेस तू? आता बोलतो आहे शेवटी.. आणि सोनालीचा आवाज चढतो.

आदिश म्हणतो, “एक मिनिट.. आवाज चढवू नकोस माझ्यावर.. फुकट आवाज नाही चढवायचा. सोनालीचे म्हणणे आहे- मी आवाज नाही चढवत.. तू बोलायला लागलास तर मी उत्तर नाही द्यायचं का? आणि कुठल्या आवाजात सांगायचं ते तू मला नको सांगू. माझा आवाज असाच आहे. मी असंच बोलणार.. आणि वाद पुढे वाढत गेला. बघूया पुढे काय होतं ते आजच्या भागामध्ये.

बिग बॉसच्या घरामध्ये कालपासून सुरू आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक..”, हे कॅप्टन्सी कार्य. काल टीम ए पूर्णपणे जणू मीरासाठीच खेळत होती की काय, असा प्रश्न प्रेक्षकांनादेखील पडला असेलच. मीनलची कॅप्टन बनण्याची इच्छा अपुरी राहिली. कारण, उमेदवारीमधून ती बाहेर पडली. आदिश आणि मीरामध्ये काल उमेदवारीचा सामना रंगला. ज्यामध्ये अगदीच सहजरित्या मीरा जिंकली आणि ती ठरली कॅप्टनपदाची पहिली उमेदवार.

आज टीम ए म्हातारी बनणार असून टीम बी म्हणजेच विशाल, सोनाली.. प्राणी बनणार आहेत. म्हणजेच या टीमला भोपळे लपवायचे आहेत. आणि विकास टीम एमध्ये असल्याने तो  टीम बीसोबत कार्याची रणनीती आखताना दिसणार आहे. अकारण कुठेतरी त्यालाही कॅप्टन होण्याची इच्छा आहे.

विकासचे म्हणणे आहे, “दुसर्‍या राऊंडला आजीचे गाठोडे आहे ना.. ते उघडायचे आणि त्याच्यामध्ये भोपळा ठेवायचा. काल आम्ही पहिले ते उघडून… भोपळा ठेवला की, परत गाठोडं आहे तिथे ठेवायचे. मी येणार डायरेक्ट गाठोड घेऊनच आत येणार. तिघांना बाहेर काढायचे आहे. विशाल तुझं पहिलं काम.. जिथे जयचा टाकशील तिथे उत्कर्षचा टाकशील आणि तिथेच दादूसचा पण टाकशील. आपल्याला हे तीन लोक बाहेर काढायचे आहेत. हे तीन एकदा बाहेर गेले की मग… पुढे मग खेळवा तुम्ही सगळ्यांना. कारण, तेव्हा फक्त मुली राहतील. काल जे ते करत होते ना, आपल्याला तितकं नाही करायचे.. पण… आणि पुढे अजून काही योजना आखल्या जातात. बघूया कोण बाजी मारते ते आजच्या भागात.. बिग बॉस मराठीत.. रात्री कलर्स मराठीवर..

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content