Homeचिट चॅटप्रभादेवीत ८ फेब्रुवारीपासून...

प्रभादेवीत ८ फेब्रुवारीपासून ‘स्वामी समर्थ’ची व्यावसायिक कबड्डी!

गेली आठ दशके प्रभादेवीत कबड्डीचा दम घुमवणार्‍या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने अव्वल १२ व्यावसायिक संघांचा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. येत्या ८ ते ११ फेबू्रवारीदरम्यान विशेष व्यावसायिक पुरूष गट कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने दिग्गज कबड्डीपटूंचा चढाई-पकडींचा थरार कबड्डीप्रेमींना अनुभवता येणार आहे.

कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देताना दिमाखदार स्पर्धांचे आयोजन करणार्‍या ८१ वर्षांच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाही मंडळाच्या विशेष व्यावसायिक स्पर्धेत इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), सेंट्रल बँक, मुंबई महानगरपालिका, रिझर्व्ह बँक, मिडलाईन अ‍ॅकॅडमी, एमपीएमसी पुणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा बलाढ्य संघांचा दमदार खेळ चवन्नी गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळणार आहे.

विजेते होणार लक्षाधीश

कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून या स्पर्धेत विजेत्या संघाला लाखमोलाचे म्हणजे १,११,१११ रुपयांचे रोख इनाम दिले जाणार असल्याची माहिती आमदार आणि मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी दिली. उपविजेत्या संघालाही ८० हजार रुपये आणि चषक दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपांत्य सामन्यात पराभूत झालेल्या संघांनाही रोख इनाम देऊन सन्मानित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेत एकंदर १२ बलाढ्य संघ खेळणार असून तीन-तीन संघांचे चार गट खेळविले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी एकमेकांशी भिडतील. स्पर्धा अधिक रंजक आणि थरारक व्हावी म्हणून एकाच मॅटवर खेळविली जाणार असून प्रत्येक दिवशी पाच सामने खेळविले जाणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडाप्रमुख रवी शिंदे यांनी दिली.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content