Homeमाय व्हॉईसस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उद्या पंतप्रधान मोदी करणार समारोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 15 ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन 76व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा प्रारंभ करतील. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित करतील. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. 12 मार्च 2021ला अहमदाबादमध्ये साबरमती आश्रमातून पंतप्रधानांनी याचा प्रारंभ केला होता. 2047पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा सोहळा नवी उमेद देत पुन्हा अमृत काळ प्राप्त करून देईल.

76वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या समारंभासाठी समाजातल्या विविध क्षेत्रातल्या सुमारे 1800 जणांना त्यांच्या जोडीदारासह विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या ‘जन भागीदारी’ या दृष्टीकोनाला अनुसरून हा उपक्रम आहे.

या विशेष अतिथींमध्ये 660पेक्षा जास्त व्हायब्रंट व्हिलेजेसचे 400 सरपंच, शेतकरी उत्पादक संघटना योजनेतील 250 व्यक्ती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमधले प्रत्येकी 50 व्यक्ती, सेन्ट्रल विस्टा प्रकल्प, नवे संसद भवन, सीमावर्ती भागातली रस्ते बांधणी, अमृत सरोवर, हर घर जल योजना यासाठी काम करणारे 50 श्रमयोगी (बांधकाम मजूर), 50 खादी कामगार, प्राथमिक शिक्षक, परिचारिका, मच्छिमार वर्गातले प्रत्येकी 50 जणांचा समावेश आहे. यापैकी काही विशेष अतिथी दिल्लीमधल्या आपल्या मुक्कामात राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील व संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची भेट घेतील. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशामधल्या 75 जोडप्यांना त्यांच्या पारंपारिक वेशात लाल किल्यावरच्या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम अधोरेखित करणारे ‘सेल्फी पॉइंटस’ 12 महत्त्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्थानक, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्थानक, राजीव चौक मेट्रो स्थानक, दिल्ली गेट मेट्रो स्थानक, आयटीओ मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वारा यांचा यात समावेश आहे. ‘सेल्फी पॉइंटस’मध्ये, जागतिक आशा : लस आणि योग; उज्वला योजना; अंतराळ सामर्थ्य; डिजिटल इंडिया; स्कील इंडिया; स्टार्ट अप इंडिया; स्वच्छ भारत; सशक्त भारत, नव भारत; प्रधानमंत्री आवास योजना आणि जल जीवन अभियान या योजनांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यदिन समारंभाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने MyGov पोर्टल वर 15-20 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन सेल्फी स्पर्धा आयोजित केली आहे. जनतेने या 12पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी सेल्फी काढाव्यात व MyGov पोर्टल वर अपलोड करावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ऑनलाईन सेल्फी स्पर्धेअंतर्गत प्रत्येक ठिकाणच्या एक, अशा एकूण बारा विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्याला प्रत्येकी 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

यावेळी सर्व अधिकृत निमंत्रणे आमंत्रण पोर्टल (http://www.aamantran.mod.gov.in/) द्वारे पाठवण्यात आली आहेत. या पोर्टलद्वारे 17,000 ई–निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content