Homeटॉप स्टोरीलता मंगेशकर पुरस्कार...

लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान मोदींनी केला देशवासियांना अर्पण!

मी पुरस्कार शक्यतो टाळतो. पुरस्कारांमध्ये रमणारा माझा पिंड नाही. परंतु, लतादीदींच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मी टाळू शकतच नव्हतो. माझे ते दायित्वच होते. दैनंदिन कार्यक्रम कोणते आहेत हे न पाहता मी या कार्यक्रमाला यायचे मान्य केले. मला मिळालेला हा पुरस्कार मी सर्व देशवासियांना अर्पण करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.

मास्टर दीनानथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या वतीने आज षण्मुखानंद सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिलावहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. लतादीदी प्रत्येकाच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारही प्रत्येकाचाच आहे, असे त्यांनी सांगितले.

संगीत फक्त साधना नाही तर ती भावना आहे. अव्यक्तला व्यक्त करणारे शब्द; ऊर्जा, चैतन्य देणारा नाद, यांचा मिलाफ म्हणजे संगीत आहे. संगीताची ही ताकद म्हणजे लतादीदी होत. आम्ही सौभाग्यवान आहोत की, आम्ही लतादीदींना पाहू शकलो. मंगेशकर कुटुंबाने संगीताच्या या यज्ञात पिढ्यान् पिढ्यांची आहुती दिली आहे. सुधीर फडके यांनी मला पहिल्यांदा लतादीदींची ओळख करून दिली. तेव्हापासून या कुटुंबाबरोबर माझे अतूट असे पारिवारीक संबंध प्रस्थापित झाले. एका मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांनी मला अपार प्रेम दिले. यापेक्षा एखाद्याला काय मिळायला हवे? यावेळी रक्षाबंधन येईल, पण दीदी नसेल, असे भावोत्कट उद्गारही पंतप्रधान मोदी यांनी काढले.

लतादीदी वयाने तर मोठ्या होत्याच. पण, कर्तृत्त्वानेही तितक्याच मोठ्या होत्या. संगीतक्षेत्रावर तब्बल ८० वर्षे त्यांनी आपला ठसा उमटवला. ग्रामोफोन, रेकॉर्ड, कॅसेट, सीडी, पेनड्राइव्ह ते ऑनलाईन, अशा सर्व स्थित्यंतराच्या त्या साक्षीदार होत्या. देशाच्या या अमृतमहोत्सवी वर्षात मंगेशकर कुटुंबाचे योगदान प्रत्येक घरात पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले.

लता

मुख्यमंत्री ठाकरे यांची दांडी, सुभाष देसाई हजर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीत राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तेथे उपस्थित असायला हवे होते. परंतु, सरकारचा प्रतिनिधी म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. विमानतळावर मात्र, पंतप्रधानांच्या स्वागताला त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही गेले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

पं. हृदयनाथ मंगेशकर अनुपस्थित

संस्थेचे अध्यक्ष पं. हृदयनाथ मंगेशकर प्रकृती आस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. ते रूग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे त्यांचे चिरंजीव आदिनाथ मंगेशकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सहकुटूंब परळला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम टाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपल्या पत्नी रश्मी, मुलगे आदित्य तसेच तेजस यांच्यासह याच काळात मातोश्री निवासस्थानाबाहेर पडत परळला गेले. तेथे त्यांनी ८० वर्षांच्या शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांच्या घरी हजेरी लावली. खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांच्या कालच्या आंदोलनाच्या काळात मातोश्रीबाहेर कडे करून बसलेल्या शिवसैनिकांमध्ये त्याही होत्या. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री सहकुटूंब त्यांच्या घरी गेले होते. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना आपल्या घरी बोलावूनही त्यांचे कौतुक केले होते. आपल्या भेटीत त्यांनी या आजींना वर्षा निवासस्थानी येण्याचे निमंत्रणही दिले.

शिवसैनिक कधी झुकणार नाही, हे या आजींनी दाखवून दिले. वयोमान वाढले असले तरी त्या खऱ्या अर्थाने युवा सेनेच्याच कार्यकर्त्या आहेत. शिवसेनाप्रमुखांनी दिलेले हे देणे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content