राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 15 जानेवारीपासून 17 जानेवारी 2024, या कालावधीत मेघालय आणि आसामला भेट देणार आहेत. आज राष्ट्रपती तुरा येथील पीए संगमा मैदानावर, मेघालय राज्य क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतील.
उद्या, 16 जानेवारी रोजी, राष्ट्रपती तुरा येथील बाल्जेक विमानतळ इथे बचतगटांच्या सदस्यांना संबोधित करतील आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तुरा येथील नवीन एकात्मिक प्रशासन संकुलाची पायाभरणी करतील. त्याच दिवशी, राष्ट्रपती मावफ्लांग येथे एका मेळाव्याला संबोधित करतील आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नव्याने सुधारणा करण्यात आलेल्या रोंगजेंग मंगसांग एडोकग्रे रस्त्याचे आणि मैरांग रानीगोडाउन आजरा रस्त्याचे उद्घाटन करतील. तसेच शिलाँग शिखरावर जाण्यासाठीच्या रोपवेची आणि कोंगथॉन्ग, मावलिनगोट आणि कुदेनग्रीम या गावांमध्ये पर्यटकांच्या निवासस्थानांची पायाभरणी करतील. संध्याकाळी, राष्ट्रपती शिलॉंग येथील राजभवनात मेघालय सरकारतर्फे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहतील.
17 जानेवारी रोजी, आसाममधील तारांगसो, दिफू येथे कार्बी युवा महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहतील.