Homeचिट चॅटसचिनभाऊ चषक शालेय...

सचिनभाऊ चषक शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहिलेल्या प्रसन्नने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या पुष्कर गोळेचे आव्हान १३-९ असे संपुष्टात आणले. दमदार प्रारंभासह ९-० अशी आघाडी घेणाऱ्या पुष्कर गोळेला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

परळ येथील वातानुकुलीन आरएमएमएस सभागृहामधील उपांत्य सामन्यात पुष्कर गोळेने न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतचा तर प्रसन्न गोळेने शारदाश्रम विद्यामंदिर-दादरच्या सोहम जाधवचा पराभव केला. स्पर्धेमध्ये आर्यन राऊत व सोहम जाधवने उपांत्य उपविजेतेपद मिळविले तर‌ पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या निधी सावंत व अद्वैत पालांडे, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, एसव्हीएस इंग्लिश स्कूलचा समीर कांबळे यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद तर अमेय जंगम, गौरांग मांजरेकर, शिवांश मोरे, प्रेक्षा जैन, वेदांत पाटणकर, तीर्थ ठक्कर, साईराज साखरकर, उमैर पठाण यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद पटकावले.

मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, जैतापूर आदी जिल्ह्यातील शालेय सबज्युनियर ४० कॅरमपटूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. शालेय खेळाडूंना मार्गदर्शनासह प्रोत्साहन देण्यासाठी १ मे रोजी होणाऱ्या मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्या ४ विजेत्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर, सिध्दीविनायक प्रसाद व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

Continue reading

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...
Skip to content