Saturday, February 8, 2025
Homeडेली पल्समुंबईत विद्युत क्षेत्रावरील...

मुंबईत विद्युत क्षेत्रावरील प्रदर्शन आणि परिषदेचे उद्‌घाटन!

भारतीय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक संघटनेने (आय. ई. ई. एम. ए.) आयोजित केलेल्या विद्युत क्षेत्रावरील ‘बी. आय. डी. 2024’ या ‘बिल्ड ई. एल. ई. सी., इंटेल ई. एल. ई. सी. टी. आणि डिस्ट्रिब्यु. ई. एल. ई. सी.-2024’ या शीर्षकाच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आणि परिषदेचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी काल मुंबईतील गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात केले.

भारत ही जगातील सर्वात वेगवान दराने वाढणारी, सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. हे वीज क्षेत्रामुळे शक्य झाले आहे. विजेशिवाय औद्योगिकीकरण होत नाही आणि देशात विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे वीज क्षेत्रातील उत्पादकांसाठी ही मोठी बाजारपेठ आहे, असे याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री आर. के. सिंह म्हणाले.

ऊर्जा क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे समभाग वाढले आहेत. आपल्या देशात जेनकोस (वीज निर्मिती कंपन्या)ची कोणतीही बिले प्रलंबित नाहीत. सर्व देयकेही जवळजवळ पूर्ण केली आहेत, असे ते म्हणाले. हे सांगताना ऊर्जा मंत्र्यांनी वीज क्षेत्रातील भागधारकांना नेतृत्व करण्याचे आणि विकास करण्याचे आवाहन केले. गेल्या नऊ वर्षांत पारेषण जाळ्यामध्ये 65 टक्के वाढ झाली आहे. डिस्कॉम्सचा तोटा देखील 2014 मधील सुमारे 27 टक्क्यांवरून 2023 मध्ये सुमारे 15 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे आणि तो आणखी 12 टक्क्यांपर्यंत जाईल. आम्ही सर्व ग्राहकांसाठी स्मार्ट प्री-पेड मीटरच्या दिशेनेही जात आहोत, असे ते म्हणाले. वितरण कंपन्यांबद्दल बोलताना केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणाले की, सध्याच्या धोरणात प्रत्येक वितरण परवानाधारकाला वीज पर्याप्ततेसाठी वेगवेगळ्या स्थापित क्षमता जोडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जेणेकरून ते त्यांच्या अखत्यारीतील क्षेत्रांची मागणी पूर्ण करू शकतील.

केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे त्यांच्याशी संबंधित कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल आणि थकबाकीदारांवर दंड आकारला जाईल. कोणताही वितरण परवानाधारक वीज विनिमयातील उच्च किंमतीमुळे त्यांची जबाबदारी टाळू शकत नाही आणि परवानाधारक क्षेत्रात पुरवठ्याच्या कमतरतेमुळे वीज प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यास दंड केला जाईल.

अधिक क्षमता मोठ्या वेगाने स्थापित केली जात आहे जेणेकरून अधिक ऊर्जा उत्पादक आणि पुरवठादार (पीपीएस) पुढे येतील आणि सर्वसामान्यांना 24×7 वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकेल, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितली. ग्रामीण भागात वीजेची उपलब्धता 2015 मधील 12 तासांवरून 20.6 तासांवर पोहोचली आहे आणि शहरी भागात ती 23.8 तासांपर्यंत वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.

अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापित केली जात असल्याचेही आर. के. सिंह यांनी सांगितले. येत्या काही वर्षांत, पॉली-सिलिकॉनपासून ते फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्सपर्यंत अक्षय वीज क्षेत्राची संपूर्ण मूल्यसाखळी, भारतात निर्माण होईल. हरित हायड्रोजनमध्येही देश अग्रणी असेल, असेही केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणाले.

सध्या 18000 मेगावॅट जलविद्युत क्षमता निर्माणाधीन असल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले. जलविद्युत ऊर्जा साठवणूक आणि विसर्जन पंपांबाबत काम करण्याचे आवाहन त्यांनी या क्षेत्रातील संबंधितांना केले. जलविद्युत ऊर्जेशी संबंधित घटक आयात न होता देशात तयार केले जावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

सर्वाधिक मागणी 2014 मधील 136 मेगावॅटवरून 2023 मध्ये 243 मेगावॅटवर पोहोचली आहे.  त्यामुळे सर्वोच्च मागणीत सुमारे 80% वाढ नोंदवली गेली आहे, तर याच कालावधीत स्थापित वीज निर्मिती क्षमता जवळपास 70% वाढून 280 गिगावॅट वरून 426 गिगावॅटवर पोहोचली असल्याची माहिती ऊर्जा मंत्र्यांनी दिली. इलेक्ट्राव्हर्स स्पार्क्स स्पर्धा 2024 मधील सर्वोत्कृष्ट 7 स्टार्टअप्सना प्रशंसा प्रमाणपत्रे त्यांनी प्रदान केली. तसेच इलेक्रमा ( ELECRAMA) 2025 चे अनावरणदेखील त्यांनी केले आणि प्रदर्शनातील स्टॉल्सना भेट दिली.

‘डिस्ट्रीब्यू-इलेक’ विभागात पारंपारिक विद्युत उपकरण जसे ट्रान्सफॉर्मर, केबल्स, कॅपॅसिटर, स्विचगियर्स, मीटर, इन्सुलेटर, कंडक्टर, 11KV पासून 33KV पर्यंत वीज वितरणामध्ये वापरल्या जाणार्‍या उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवा, आणि स्वयंचलित्र वितरण व नियंत्रण पद्धतीतील नव्या युगातले तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता, मागणी प्रतिसाद, प्रगत मीटरिंग, संप्रेषण तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, इलेक्ट्रिकल फायर सेफ्टी अशा बऱ्याच बाबी आहेत. बिल्ड-इलेक’विभागात घरे, रुग्णालये, हॉटेल्स आणि कार्यालये अशा H3O इमारतींसाठी विद्युत प्रणालीसाठी संबंधित बाबी दर्शवल्या आहेत.

6 वी इंटेलेक्ट परिषद परिवर्तनात्मक प्रवास – विश्वसनीय, टिकाऊ आणि सुरक्षित प्रोझ्युमर (उच्च गुणवत्ता तंत्रज्ञान उत्पादने वापरू इच्छिणारा ग्राहक) परिसंस्था या संकल्पनेवर डिस्ट्रीब्यू-इलेक आणि बिल्ड-इलेक प्रदर्शनांसह 17 आणि 18 जानेवारी 2024 रोजी आयोजित केली जाईल.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content