Homeबॅक पेजकारगिल विजय दिनानिमित्त...

कारगिल विजय दिनानिमित्त टपाल तिकीट जारी

कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त गोवा टपाल विभागाने शुक्रवारी पणजी येथील मुख्य टपाल कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भारतीय नौदलाचे कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) आणि टपाल सेवा (गोवा प्रदेश), पणजीचे संचालक रमेश पी. पाटील यांच्या हस्ते विशेष तिकीट जारी केले.

कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) यांनी आपल्या भाषणात कारगिल युद्धात भारतीय नौदलाने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. तसेच त्यांनी युद्धादरम्यानचे आपले विचार आणि अनुभवही सामायिक केले. गोवा विभाग, पणजी येथील टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक एस. व्ही. एल.

एन. राव, टपाल सेवा-l, गोवा प्रदेश, पणजीचे सहाय्यक संचालक संजय देसाई, गोवास्थित राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे सेवानिवृत्त वैज्ञानिक डॉ. एम. आर. रमेश कुमार आणि टपाल विभागाचे कर्मचारी या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.

डॉ. एम. आर. रमेश कुमार हे एक टपाल तिकीट संग्राहकदेखील आहेत. त्यांनी कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त पणजी टपाल मुख्यालयाच्या समोर फिलाटली ब्युरो येथे टपाल तिकिटांचे वन-फ्रेम प्रदर्शन आणि ‘ऑलिम्पिक विश्वातील एक फिलाटेलिक प्रवास’ या संकल्पनेवर चार फ्रेमचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन 11 ऑगस्ट 2024पर्यंत लोकांसाठी खुले राहील.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content