Homeकल्चर +'कप बशी'त दिसणार...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी “कप बशी” या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे.

या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक जोशी यांची असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असलातरी त्यांचं चित्रपटसृष्टीशी असलेलं नातं जुनंच आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी यांनी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या “पुत्रवती” या चित्रपटासाठी कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशा सर्वच बाजूंवर काम केलं होतं. त्या चित्रपटानं राष्ट्रीय, राज्यस्तरीय १४ पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यात फिल्मफेअर, स्क्रीन, राज्य पुरस्काराचा समावेश होता. त्यामुळे वडिलांचं प्रेरणादायी काम आणि त्यांचा कलात्मक वारसा आता ‘कप बशी’ या चित्रपटातून ते पुढे आणत आहेत.

वैभव चिंचाळकर हे टीव्ही मालिका, नाटक, मराठी चित्रपटातलं सुपरिचित नाव आहे. वैभव यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाइन, पुढचं पाऊल अशा अनेक गाजलेल्या मालिका, पुष्पक विमान या चित्रपटसाठी दिग्दर्शन केले होते. उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभवचं नाव घेतलं जातं. या चित्रपटातून वैभव कोणती नवी गोष्ट सादर करतो याची उत्सुकता आहे. पूजा सावंतनं अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं आहे तर ऋषि मनोहरनं टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटांतून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. त्यामुळे या दोघांची फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल आहे. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content