Thursday, May 22, 2025
Homeकल्चर +'कप बशी'त दिसणार...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी “कप बशी” या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे.

या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक जोशी यांची असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असलातरी त्यांचं चित्रपटसृष्टीशी असलेलं नातं जुनंच आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी यांनी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या “पुत्रवती” या चित्रपटासाठी कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशा सर्वच बाजूंवर काम केलं होतं. त्या चित्रपटानं राष्ट्रीय, राज्यस्तरीय १४ पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यात फिल्मफेअर, स्क्रीन, राज्य पुरस्काराचा समावेश होता. त्यामुळे वडिलांचं प्रेरणादायी काम आणि त्यांचा कलात्मक वारसा आता ‘कप बशी’ या चित्रपटातून ते पुढे आणत आहेत.

वैभव चिंचाळकर हे टीव्ही मालिका, नाटक, मराठी चित्रपटातलं सुपरिचित नाव आहे. वैभव यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाइन, पुढचं पाऊल अशा अनेक गाजलेल्या मालिका, पुष्पक विमान या चित्रपटसाठी दिग्दर्शन केले होते. उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभवचं नाव घेतलं जातं. या चित्रपटातून वैभव कोणती नवी गोष्ट सादर करतो याची उत्सुकता आहे. पूजा सावंतनं अनेक मराठी, हिंदी चित्रपटात उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं आहे तर ऋषि मनोहरनं टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटांतून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. त्यामुळे या दोघांची फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतूहल आहे. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

कुर्ल्यात शालेय मुलांचे कबड्डी शिबिर संपन्न

गोरखनाथ महिला संघ, हनुमान क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने ज्ये‌ष्ठ राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच प्रशिक्षक बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील गांधी मैदानात शालेय मुलांसाठी पाच दिवसांचे मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले. 50पेक्षा जास्त शालेय...

प्राचीन शिलाईतंत्राद्वारे बांधलेले जहाज आजपासून नौदलाच्या सेवेत!

कारवारच्या नौदल तळावर प्राचीन शिलाईतंत्राचा वापर करून बांधलेल्या जहाजाला आज भारतीय नौदलाकडून समारंभपूर्वक आपल्या ताफ्यात दाखल केले जाणार आहे. या समारंभातच या जहाजाच्या नावाचेही अनावरण होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार...

‘असेन मी.. नसेन मी…’ नाटकाला साडेसात लाखांचे पहिले बक्षिस!

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ३५व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत स्क्रिप्टीज क्रिएशन्स प्रस्तुत ‘असेन मी.. नसेन मी..’ या नाटकाने ७ लाख ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावून गौरव प्राप्त केला आहे. संचालनालयाचे संचालक बिभीषण...
Skip to content