Homeटॉप स्टोरी'नीट' परीक्षेत 'फिजिक्स'ने...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली ‘नीट-युजी २०२६’ ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय काठीण्य पातळी पाहता अनेक विद्यार्थ्यांना फिजिक्स कठीण, तर बायोलॉजी सोपा गेला. विद्यार्थी आणि शिक्षण तज्ञांच्या मते, पेपरचे स्वरूप संमिश्र होते. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, पेपरची काठीण्य पातळी पाहता यंदाचा सरासरी कटऑफ गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडा खाली येऊ शकतो किंवा स्थिर राहू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटीचा सखोल अभ्यास केला आहे, त्यांना केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये चांगले गुण मिळतील, असे नवी मुंबई परिसरातील एका नामांकित शाळेतील शिक्षिका प्रा. दीपाली सोनवणे-पाटील यांनी सांगितले.

नीट परीक्षेचा विषयनिहाय आढावा

  • भौतिकशास्त्र: बहुतांश विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्राचा पेपर सर्वात कठीण असल्याचे सांगितले. गणितावर आधारित (कॅलक्युलेटीव्ह) प्रश्नांची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला. प्रा. सोनवणे-पाटील यांच्या मते, काही प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचे होते.
  • रसायनशास्त्र: हा पेपर मध्यम स्वरूपाचा होता. यामध्ये ‘ऑरगॅनिक’ आणि ‘इनऑरगॅनिक’ केमिस्ट्रीचे प्रश्न थेट एनसीईआरटी पुस्तकांवर आधारित होते, परंतु ‘फिजिकल केमिस्ट्री’चे प्रश्न थोडे वेळखाऊ होते.
  • जीवशास्त्र: दरवर्षीप्रमाणे जीवशास्त्राचा पेपर तुलनात्मकदृष्ट्या सोपा होता. मात्र, विधाने आणि कारणे (असर्शन – रीझनिंग) प्रकारचे प्रश्न जास्त असल्यामुळे तो वाचण्यात अधिक वेळ गेला.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया: गेल्या वर्षीपेक्षा पेपर कठीण?

काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, २०२५च्या तुलनेत २०२६चा पेपर अधिक आव्हानात्मक होता. विशेषतः फिजिक्समधील लांबलचक कॅल्क्युलेशन्समुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले. “बायोलॉजी सोपा होता, पण फिजिक्सने खऱ्या अर्थाने कसरत करायला लावली,” अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील एका केंद्रावरील परीक्षार्थीने दिली.

ॲन्सर शीट आणि निकालाबाबतची अपडेट

  • प्रोव्हिजनल ॲन्सर की: नॅशनल टेस्टिंग एजन्सी साधारणपणे परीक्षेच्या २ ते ३ आठवड्यांनंतर अधिकृत ‘प्रोव्हिजनल ॲन्सर की’ प्रसिद्ध करते, अशी माहिती प्रा. दीपाली सोनवणे-पाटील यांनी दिली. म्हणजेच, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना उत्तरे तपासता येतील.
  • हरकती नोंदवणे: ॲन्सर की प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ठराविक शुल्क भरून प्रश्नांवर हरकती नोंदवण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ दिला जाईल.
  • निकाल: जून २०२६ च्या मध्यापर्यंत नीट परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये आणि त्रुटी

  • कडक सुरक्षा आणि ड्रेस कोड: देशभरातील केंद्रांवर कडक ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. केंद्रांवर डिजिटल बायोमेट्रिक्स आणि सखोल तपासणीनंतरच प्रवेश देण्यात आला.
  • तांत्रिक त्रुटी: काही तुरळक केंद्रांवर पेपर सुरू होण्यास थोडा विलंब झाल्याच्या बातम्या आहेत, मात्र एनडीएने कोणतीही मोठी तांत्रिक चूक किंवा पेपर फुटीसारखी घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
  • विक्रमी उपस्थिती: यंदा वैद्यकीय शिक्षणासाठीची चढाओढ वाढल्याने अर्जदारांची संख्या २३ लाखांच्या पार गेली होती, ज्यामुळे कट-ऑफवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Continue reading

वसुबारस आणि भाऊबीज नाहीत दीपावलीचे भाग!

दीपावली हा प्रकाशाचा उत्सव! अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला...

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...
Skip to content