पुण्याच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयाकडून येत्या 15 ते 17 एप्रिलदरम्यान पुण्याच्याच एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पासपोर्ट (पारपत्र) सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पारपत्रासाठी नियोजित वेळेची सोय लवकर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पारपत्र वितरणसेवा सर्वदूर सहज देता यावी या उद्देशाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
कागदपत्रे: अर्ज ऑनलाइन सादर करण्यापूर्वी, प्रौढ आणि अल्पवयीन अशा दोन्ही अर्जदारांसाठी दिलेल्या तपाससूची (checklists) काळजीपूर्वक वाचावी. अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी, पारपत्र प्राधिकरणाला अर्ज निकाली काढण्यासाठी आवश्यक वाटल्यास सर्व प्रकारची चौकशी करण्याचा तसेच अर्जदाराकडून अतिरिक्त माहिती आणि कागदपत्रे मागवण्याचा अधिकार आहे.
अशी बुक करा मोबाइल व्हॅनसाठी अपॉइंटमेंट:
i) (https://www.passportindia.gov.in) या पासपोर्ट इंडियाच्या संकेतस्थळाला भेट द्या आणि ‘NORMAL’ योजनेअंतर्गत अर्ज सादर करा.
ii) ऑनलाइन पेमेंट पूर्ण केल्यानंतर शेड्यूल अपॉइंटमेंट पेजवर जा, लोकेशनमध्ये मोबाइल व्हॅन हा पर्याय निवडा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा.
पासपोर्ट मोबाईल सेवा केंद्राचा तपशील:
i) दिनांक: 15, 16 आणि 17 एप्रिल
ii) स्थळ: ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस), 1, केनेडी रोड, आरटीओ कार्यालयाजवळ, रेल्वे ऑफिसर्स कॉलनी, पुणे 411001.
iii) वेळ: सकाळी 08:30 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत (अर्जदारांनी, ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर नमूद केलेल्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित राहवे.)

