Homeएनसर्कलमहापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर द्या...

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर द्या वह्या, पेन, पुस्तकांची आदरांजली!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक संदेश अंमलात आणण्यासाठी ६ डिसेंबर, या त्यांच्या ६६व्या महापरिनिर्वाणदिनी वह्या, पेन, पुस्तकांची आदरांजली द्यावी, असे आवाहन आंबेडकर कुटुंबियांसह विविध मान्यवरांनी केले आहे.

महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करताना वह्या, पेन, पुस्तकांची आदरांजली द्यावी असे आवाहन महामानव प्रतिष्ठान व ‘एक वही, एक पेन’ अभियानच्या वतीने नेहमी करण्यात येते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक संघर्ष, शैक्षणिक अर्हता तसेच त्यांनी जनतेला दिलेला शिक्षणाचा संदेश लक्षात घेता हा संदेश अंमलात आणण्यासाठी, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमीवर येताना वह्या, पेन, पुस्तकांची व इतर शैक्षणिक साहित्य घेऊन यावे असे आवाहन बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर व रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.

सदर साहित्याचे संकलन करण्यासाठी चैत्यभूमीशेजारील दिवंगत भैय्यासाहेब आंबेडकर स्मारक तसेच चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ भागोजी कीर पुतळा येथे संकलन केंद्र असून याठिकाणी सदर साहित्य जमा करण्यात यावे, असे महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानचे अध्यक्ष राजू झनके यांनी केले आहे. 

दरम्यान, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, पहिल्या महिला लोकशाहीरा सीमाताई पाटील, भीम आर्मीचे अशोक कांबळे, सीताराम गंगावणे, कला निर्माता, दिग्दर्शक जॉली मोरे, आरपीआय नेते राजाराम खरात, दिलीपदादा जगताप, कामगार नेते रमेश कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुमेध जाधव, भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे, समता सैनिक दल, बौध्द भंते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीदेखील एक वही, एक पेन… अभियानाला बळकटी देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शैक्षणिक आदरांजली द्यावी, असे आवाहन केले आहे.

सदर अभियानात सहभाग देण्यासाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content