Thursday, October 10, 2024
Homeडेली पल्सआता जनताच तुतारीची...

आता जनताच तुतारीची पिपाणी करणार!

विकासकामांमुळे विरोधकांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘देव तारी त्याला कोण मारी..’ आणि येथे ‘जनता म्हणजेच देव’ आहे. याच जनतेने आता ही निवडणूक हातात घेतली आहे. अस्मिता, विकास आणि जनतेच्या विरोधात निर्णय घेणार्‍यांना जनता कधीच माफ करत नाही. आता जनता तुतारीची पिपाणी करणार यात शंका नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

माढा लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण, सातारा येथे आयोजित भाजपा महाविजय संकल्प सभेत उपस्थित विशाल जनसागराला फडणवीस यांनी काल संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणकरांचे चोरीला गेलेले पाणी परत आणले. या भागात फलटण-बारामती रेल्वे आणली आणि 23 वर्ष बंद असलेल्या फलटण-पंढरपूर रेल्वेच्या कामासाठी ₹ 921 कोटींची मंजुरी मिळवली. यासोबतच पुणे-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर हा सुमारे ₹ 50,000 कोटींचा प्रकल्प त्यांच्याच पाठपुराव्यामुळे सुरू होतो आहे. या कॉरिडॉरभोवती सुरू होणार्‍या एमआयडीसीमुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे, असे ते म्हणाले.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी फलटण हिमालयासारखा उभा असल्याचीच ग्वाही या सभेला उपस्थित जनसागरानेच दिली. यावेळी परभणी लोकसभा महायुती (रासपा) उमेदवार महादेव जानकर, आ. प्रसाद लाड, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

माझी माऊली चषक कॅरम स्पर्धेत वेदांत राणे विजेता

 मुंबईतल्या सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ - जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली चषक आंतरशालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद युनिव्हर्सल स्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने पटकाविले. अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात अचूक फटक्यांची आतषबाजी करीत वेदांत राणेने प्रारंभी ७-० अशी मोठी...

राज्यपालांच्या हस्ते अभिनेते प्रेम चोप्रा सन्मानित

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईतील इस्कॉन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते आमदार डॉ....

शेख, नंदिनी, तन्मय, वैभवी, मयुर, काजल ठरले सर्वोत्तम लिफ्टर

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्य बेंचप्रेस स्पर्धेत क्लासिक गटात शेख समीर, नंदिनी उपर, तन्मय पाटील, वैभवी माने, मयुर शिंदे, काजल भाकरे यांनी आपापल्या गटात सर्वोत्तम लिफ्टरचा किताब संपादन केला. आमदार कालिदास  कोळंबकर यांच्या हस्ते...
Skip to content