Homeएनसर्कलआता रेल्वे आणि...

आता रेल्वे आणि दूरसंचार विभाग एकत्रित काढणार हरवलेल्या मोबाईलचा माग

रेल्वे प्रवाशांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक करणे, त्यांचा माग काढणे आणि ते परत मिळवण्यासाठी दूरसंचार विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यात भागीदारी झाली आहे. केंद्रीय दूरसंचार विभागाने रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईल फोनच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सुरक्षा दलासोबत ही भागीदारी केली आहे.

या भागीदारीअंतर्गत दूरसंचार विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे प्रवाशांचे हरवलेले वा चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधून ते परत मिळवण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतील. यादृष्टीने रेल मदत (Rail Madad) हे अॅप आता दूरसंचार विभागाच्या संचार साथी (Sanchar Saathi) या व्यासपीठासोबत जोडले गेले आहे.

मोबाईल

दूरसंचार विभागाच्या संचार साथी या व्यासपीठाअंतर्गत तक्रार केलेले चोरीला गेलेले/हरवलेले मोबाईल फोन ब्लॉक करण्यासाठी म्हणजेच वापरासाठी प्रतिबंधित करण्याची सुविधा उपलब्ध आहे, तर रेल मदत अॅपच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान असलेल्या तक्रारी किंवा समस्यांचे निराकरण करून घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता या दिशेने काम करताना संचार साथी पोर्टलवर रेल्वे सुरक्षा दलाची 17 क्षेत्र आणि 70हून अधिक विभागांना जोडून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता प्रवासी रेल मदत अॅपवर हरवलेल्या वा चोरी गेलेल्या मोबाईल फोनबाबत तक्रार नोंदवू शकतील. या तक्रारीचे तपशील संचार साथी पोर्टलवर पाठवले जातील. यामुळे हरवलेला/चोरी गेलेला मोबाईल फोन ब्लॉक करून त्याचा गैरवापर रोखण्यात मदत होणार आहे. याशिवाय या मोबाईल उपकरणांचा मागोवा घेणे आणि त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाला त्याबाबतची सूचना जारी करणे शक्य होईल.

याव्यतिरिक्त, दूरसंचार विभाग नागरिकांना संचार साथीच्या CEIR मॉड्यूलचा वापर करून हरवलेले वा चोरीला गेलेल्या मोबाईल फोनची तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे दूरसंचार सेवा अधिक सुरक्षित आणि वापरकर्त्यांना अनुकूल बनवण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्नांना चालना मिळू शकणार आहे. नागरिकांनी संचार साथी अॅपचा वापर करून सायबर गुन्हे आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दूरसंचार संसाधनांच्या गैरवापर होत असल्याबाबतच्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहनही दूरसंचार विभागाने केले आहे. सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतर्गत, ग्राहक हितांचे रक्षण करण्यासाठी दूरसंचार विभाग कठोर देखरेख आणि तातडीच्या कारवाईसाठी प्रयत्नशील आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content