Homeएनसर्कलआता आभासी चोरांना...

आता आभासी चोरांना पकडणार ‘फेकबस्टर’!

पंजाबमधल्या रोपारमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी एक अनोखी पडताळणी प्रणाली (डिटेक्टर) विकसित केले आहे. कोणालाही कळू न देता आभासी बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्या आभासी चोरांना हुडकून काढणारी ‘फेकबस्टर’ नावाची प्रणाली त्यांनी तयार केली आहे. सामाजिक माध्यमांवर (सोशल मीडियावर) बदनामी करणे किंवा खिल्ली उडवणे अशा कामात गुंतलेल्यांचे चेहरे उघडे पाडण्याचेही कामही फेकबस्टर करू शकते.

सध्याच्या महामारीच्या काळात अनेक कार्यालयीन, अधिकृत बैठका ऑनलाईनच होत असतात. अशात आभासी बैठकीत एखाद्या सहभागी सदस्याच्या चित्रिकरणात कोणी फेरफार करत असेल तर आयोजकांना ते हुडकून काढण्यात फेकबस्टर उपयोगी ठरेल. म्हणजे आभासी बैठक किंवा बेबिनारमधे कुणी एखाद्याच्या वतीने अथवा त्याच्या चेहऱ्याचा वापर करुन अवैधरित्या घुसखोरी करत असेल तर ही प्रणाली ते शोधू शकते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन माध्यमांमधे प्रसारित होणाऱ्या साहित्यात फेरफार करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हे तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत आणि स्थायी होत चालले आहे. यामुळे व्यवस्था सुरक्षित राखण्यासाठी अशा गैरकृत्याचा शोध घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे डॉ. अभिनव धाल यांनी म्हटले आहे. फेकबस्टर विकसित करणाऱ्या चार सदस्यीय पथकाचे ते प्रमुख सदस्य आहेत. 

फेकबस्टरने 90 टक्के अचूकता साध्य केली आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. धाल याच्यांसोबत सहप्राध्यापक रामनाथन सुब्रमण्यम, विद्यार्थी विनित मेहता आणि पारुल गुप्ता या पथकातील अन्य सदस्य आहेत.

फेकबस्टर प्रणाली आभासी बैठकातील गैरसहभाग शोधून काढते. याबाबतचा प्रबंध गेल्या महिन्यात 26 तारखेला अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला. इंटेलिजेंट यूजर इंटरफेसेस हा परिषदेचा विषय होता. ही सोफ्टवेअर प्रणाली आभासी बैठकांसाठी वैयक्तिकृत व्यासपीठ असून झूम आणि स्काईपसारख्या अॅप्लिकेशनवर त्याची चाचणी घेण्यात आली आहे.

फेकबस्टर, हे ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजेच इंटरनेट सुरू असताना आणि बंद असतानाही वापरता येते. सध्यातरी याचा वापर लॅपटॉप आणि संगणकावरच करता येतो. बोगस ऑडिओ म्हणजेच बोगस आवाजाच्या माध्यमातून होणारी फसवणूक शोधण्यासाठी उपकरण तयार करण्याचाही पथकाचा प्रयत्न सुरू असल्याचे सह प्राध्यापक सुब्रमण्यम यांनी सांगितले.

डिपफेक शोध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थेट प्रसारण सुरू असलेल्या आभासी बैठकीतील अवैध सहभागींना हुडकून काढणारे फेकबस्टर हे पहिले सॉफ्टवेअर व्यासपीठ असल्याचा दावा या पथकाने केला आहे. या उपकरणाची आधीच चाचणी यशस्वी झाली असून लवकरच ते बाजारात यश मिळवेल असेही ते म्हणाले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content