Homeहेल्थ इज वेल्थमुंबईत उद्यापासून मिळणार...

मुंबईत उद्यापासून मिळणार नाकावाटे घ्‍यावयाची कोविड प्रतिबंधक लस!

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे, मुंबई महानगरातील प्रत्येक विभागात एक लसीकरण केंद्र, याप्रमाणे २४ लसीकरण केंद्रांवर, नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीद्वारे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण उद्या म्हणजेच शुक्रवार, २८ एप्रिल २०२३पासून सुरू करण्यात येणार आहे. ६० वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, त्यांनी कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येणार आहे.

पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) संजय कुऱ्हाडे यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरात कोविड संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पालिका आरोग्य प्रशासन सजगतेने कार्यरत आहे. मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी २०२१पासून कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली होती. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर १ मे २०२१पासून १८ वर्षं वयावरील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे.

कोविड

कोविड-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन/बूस्टर डोस) १० जानेवारी २०२२पासून देण्यात येत आहेत. कालअखेर (२६ एप्रिल २०२३) पालिका कार्यक्षेत्रात कोविड प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची एकूण संख्‍या २ कोटी २१ लाख ९६ हजार ९९५ इतकी आहे. यामध्‍ये पहिली मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या १ कोटी ८ लाख ९३ हजार ६७९ आहे. दुसरी मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या ९८ लाख १५ हजार ०२० इतकी आहे. प्रतिबंधात्मक डोस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या १४ लाख ८८ हजार २९६ आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या शुक्रवार, २८ एप्रिल २०२३पासून इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) ही लस ६० वर्षं वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लस देता येणार नसल्‍याचेदेखील स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील २४ ठिकाणी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लस स्थळ नोंदणी अर्थात ऑनस्पॉट नोंदणीद्वारे देण्यात येईल. २४ विभागातील सर्व लसीकरण केंद्रांची नावे व पत्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावर दररोज प्रकाशित करण्यात येतील. संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content