Homeमुंबई स्पेशलहोर्डिंगची जागा कोणाचीही...

होर्डिंगची जागा कोणाचीही असली तरी परवानगी लागणारच!

जमीन मालकी कोणाचीही असली तरीही व्यवसायासाठी परवाना घेऊनच जाहिरात फलक लावणे बंधनकारक असेल, असे मुंबईचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या जागेतील आहे. या अनधिकृत जाहिरात फलक तसेच परवाना या मुद्द्यावर रेल्वे पोलिसांशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रशासनाने पाठपुरावा केल्याचेही आयुक्तांनी अधोरेखित केले.

घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून दुर्घटना घडली, त्याठिकाणी आयुक्त गगराणी यांनी काल प्रत्यक्ष भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. संपूर्ण परिसराची पाहणी करतानाच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेशी संबंधित तपशील जाणून घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते. या पाहणीप्रसंगी सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (परिमंडळ ६) रमाकांत बिरादार, उपायुक्त (विशेष) (प्रभारी) किरण दिघावकर, सहायक आयुक्त (एन विभाग) गजानन बेल्लाळे आदी उपस्थित होते.

मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग) प्रदर्शित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची परवाना घेतलेला नाही, अशा सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पालिकेच्या प्रत्येक वॉर्डातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. विनापरवाना तसेच धोकेदायक स्थितीतील जाहिरात फलकांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छेडा नगर येथील दुर्घटना घडलेल्या ठिकाणी असलेले अन्य तीन अनधिकृत होर्डिंग्जवरदेखील तत्काळ निष्कासन कारवाई करण्यात आली आहे, असेही आयुक्त म्हणाले.

दुर्घटनाग्रस्त होर्डिंग पालिकेची विहित परवानगी न घेता उभारल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content