प्रागहून भारतात येत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच संयुक्त अरब अमिरातीत शारजाह येथे यू-स्काय तंत्रज्ञानाच्या वैमानिक प्रमाणन आणि अनुभव केंद्राला भेट दिली आणि सुरक्षा प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी स्काय बसचा प्रायोगिक प्रवास केला.
यू-स्काय तंत्रज्ञानाने स्काय बस विकसित केली आहे आणि या वाहतूक सेवा भारतात आणण्यासाठी आय-स्काय मोबिलिटीने यू-स्काय सोबत करार केला आहे.
स्काय बस शहरी प्रवाशांना कार्यक्षम वाहतूक प्रदान करताना प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करून शाश्वत, वाहतूक कोंडी मुक्त शहरी वाहतूक प्रदान करेल. शिवाय, या प्रकल्पाची उन्नत रेल्वे केबल प्रणाली जमिनीचा कमीत कमी वापर करत असल्यामुळे देशाच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये मौल्यवान भर टाकणारी आहे.