Homeन्यूज ॲट अ ग्लांसवायनाड परिसरातल्या भूकंपाच्या...

वायनाड परिसरातल्या भूकंपाच्या बातम्या भीतीपोटी..

केरळमध्ये वायनाड आणि त्याच्या जवळच्या भागात कालच्या 9 ऑगस्टला नैसर्गिक भूकंपाची कोणतीही नोंद नसल्याचं राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने स्पष्ट केल्यामुळे वायनाड आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे आणि भीतीपोटी निर्माण झाल्याचे पुढे आले आहे. केरळ राज्यात स्थापन केलेल्या भूकंप शास्त्र स्थानकांनी अशा प्रकारची कोणतीही नोंद केली नसल्याचं या केंद्राने म्हटलं आहे.

घर्षण उर्जेमुळे भूगर्भात ध्वनी कंपने निर्माण होऊन परिणामी झालेल्या भूस्खलनामुळे अस्थिर झालेले  डोंगरांवरील दगड स्थिरता मिळवण्याच्या प्रयत्नात एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर कोसळल्यामुळे ही कंपने जाणवली असावीत. ही ऊर्जा कित्येक पट वाढून भूस्तराखाली असलेल्या भेगांमधून तसंच भूपृष्ठावर असलेल्या दुभंगांशी संबंधित विभाजनातून शेकडो किलोमीटरपर्यंत जाणवू शकते. भूस्खलनप्रवण प्रदेशात ही ऊर्जा गडगडाटी आवाजासह भूप्रदेशात कंपनं निर्माण करून नैसर्गिक घटनेसमान भासू शकते, असे या क्षेत्रातल्या जाणकारांचे म्हणणे आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितल्या राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राशी संबंधित राष्ट्रीय भूकंप शास्त्र नेटवर्क या संस्थेने शुक्रवारी कोणत्याही प्रकारच्या भूकंपाची नोंद केली नसल्यामुळे भूपृष्ठाखाली कंपने जाणवणे आणि जमिनीतून येणारे गडगडाटी आवाज यापासून कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन सरकारने केले आहे. 

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content