Homeडेली पल्सयंदाच्या प्रजासत्ताकदिन समारोहात...

यंदाच्या प्रजासत्ताकदिन समारोहात एनसीसीच्या मुली विक्रमी संख्येत

राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या समारोहात सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या कॅडेट्सना त्याकरीता खास सराव करावा लागतो. यासाठी सध्या चालू असलेल्या शिबिरात यंदा सहभागी होणाऱ्या 2,361 कॅडेट्सपैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग वाढला आहे. इतकेच नव्हे तर युवक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 18 मित्रराष्ट्रांमधले 135 छात्रही यात सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या प्रजासत्ताक दिन शिबिरात 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग असून हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील 114 आणि ईशान्य विभागातील 178 छात्रांचा समावेश आहे, असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (डीजीएनसीसी) लेफ्ट. जनरल गुरबीरपाल सिंग यांनी काल दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितले. युवक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 18 मित्रराष्ट्रांमधले सुमारे 135 छात्र शिबिरात भाग घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशात एनसीसी कॅडेट्सची संख्याही 17 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढली असून त्यात 40% मुली आहेत, असे राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकांनी नमूद केले.

या शिबिरात सहभागी होणारे छात्र अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि प्रशिक्षणविषयक स्पर्धांमध्ये भाग घेतील. भारताच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणे तसेच छात्रांच्या वैयक्तिक गुणांना अधिक वाव देऊन त्यांची मूल्यप्रणाली बळकट करणे हा या शिबिराचा हेतू आहे. उपराष्ट्रपती, संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांच्यासह अनेक मान्यवर या शिबिराला भेट देणार आहेत. 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्यपथावरील प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात एनसीसीची ही तुकडीदेखील सहभागी होईल. दुसऱ्या दिवशी 27 जानेवारीला पंतप्रधानांच्या रॅलीने या उपक्रमांचा समारोप होईल, असेही सिंग यांनी नमूद केले.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content