Homeटॉप स्टोरी'लाडकी बहीण' योजनेसाठी...

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी आजपासून ‘नारी शक्ती दूत’!

महाराष्ट्रातल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतल्या लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा १ ते १५ जुलै या कालावधीत असणार आहे. यानंतर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. याकरीता महिला, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्य सेविका, सेवासुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. यांनतर या प्रतिनिधींनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर करावेत. तसेच, ज्या पात्र महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप आजपासून सुरू करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काल मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी. सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक

लाडकी बहीण

दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. यावेळी महिला व बालविकास सचिव डॉ. अनुप कुमार यादव उपस्थित होते. तर दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी निवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला अशा आवश्यक दाखल्यांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी. यासाठी गावपातळीवर विशेष शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असल्यास करावे. तसेच, जिल्हापातळीवर बँक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून संबंधित महिलांचे शून्य जमा रकमेवर खाते सुरू ठेवण्यासंदर्भात सूचना द्याव्यात, असेही तटकरे यांनी सांगितले.

Continue reading

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...

सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

मुंबईतल्या सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायिक अधिकारी पवन तापडिया आणि उत्तर विभाग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला....

का लवकर होतो तंबाखू चघळणाऱ्या व्यक्तींना तोंडाचा कर्करोग?

तंबाखू चघळणाऱ्या काही व्यक्तींना तोंडाचा कर्करोग लवकर का होतो? याचे उत्तर टाटा मेमोरियल सेंटरच्या नवीन जीनोम-वाइड अभ्यासातून उघड झाले आहे. मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटर येथील एसीटीआरईसीमधल्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी यांनी केलेल्या एका जीनोम-वाईड असोसिएशन स्टडीमध्ये असे प्रमुख अनुवांशिक...
Skip to content