Homeटॉप स्टोरीमहाविकास आघाडीच्या वज्रमूठ...

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला पटोलेंची दांडी!

एकीकडे राज्यात विविध ठिकाणी शिवसेना व भाजपाची स्वा. सावरकर गौरव यात्रा सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथील वज्रमूठ सभेकडे जनतेचे लक्ष लागले होते. मात्र या जाहीर सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एनवेळी दांडी मारली. त्यामुळे आघाडीची ही वज्रमूठ किती काळ टिकणार अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगू लागली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माफी मागण्यास नकार देताना आपण गांधी आहोत, सावरकर नाही, असे भाष्य केले होते. त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काँग्रेसवर आणि विशेषतः राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती. याचाच परिपाक पुढे स्वा. सावरकर गौरव यात्रा काढण्याच्या घोषणेत झाली. एकूण वातावरण लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर सावरकरांबद्दल अवमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल जाहीर निषेध केला. त्यामुळे आजच्या सभेत सावरकर या विषयावर उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अशा वातावरणात सावरकरांच्या बाजूने भूमिका घ्यायची की विरोधात अशा कोंडीत सापडलेल्या नाना पटोले यांनी सभेला दांडी मारण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. मात्र या सभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण यांनी मात्र हजेरी लावून भाषणे ठोकली. परंतु त्यात सावरकरांवर कोणतेही भाष्य केले नाही.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content