Friday, January 3, 2025
Homeकल्चर +नादस्वरमवादक शिवलिंगम सन्मानित

नादस्वरमवादक शिवलिंगम सन्मानित

प्रसिद्ध नादस्वरमवादक शेषमपट्टी टी शिवलिंगम यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवनगौरव पुरस्कार आज मुंबईत षण्मुखानंद सभागृहात प्रदान करण्यात आला. अडीच लाख रुपये रोख, सुवर्णलेपित कांस्याचा दिवा, नादस्वरम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज देशातील ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. श्री षण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभेने आयोजित केलेल्या ‘नादस्वर उत्सव’ या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते युवा व होतकरू नादस्वरमवादकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सभेतर्फे ही शिष्यवृत्ती तीन वर्षे देण्यात येणार आहे.

इलेक्‍ट्रॉनिक स्वरवाद्यांच्या वाढत्या प्रसारामुळे नादस्वरम हे ध्वनी वाद्य हळुहळू विलुप्त होत आहे. या वाद्याच्या जतनासाठी सभेतर्फे ५० नादस्वर कलाकारांना चक्रवर्ती टी एन राजा रथिनम पिल्लई फेलोशिप देण्यात येते.

नादस्वरम

या कार्यक्रमाला षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष डॉ व्ही शंकर, उपाध्यक्ष डॉ व्ही रंगराज, शेषमपट्टी टी शिवलिंगम आणि श्रीराम फायनान्सचे उपाध्यक्ष उमेश रेवणकर उपस्थित होते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या शाल्मली जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. य.  वि. भातखंडे यांच्या वतीने पुरस्कृत पं. भातखंडे संगीत सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत येत्या रविवारी,  ५ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता जयपूरच्या अत्रौली घराण्याच्या गायिका शाल्मली जोशी यांचे गायन होणार आहे. त्यांना...

श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धा १० जानेवारीपासून

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील १७ वर्षांखालील इयत्ता १०वीपर्यंत मुले व मुलींच्या शालेय कबड्डी संघांची श्री उद्यानगणेश मंदिर चषक कबड्डी स्पर्धा येत्या १० व ११ जानेवारीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही शालेय कबड्डी...

“स ला ते स ला ना ते”चे पोस्टर निसर्गाच्या सानिध्यात लॉन्च!

कसलेले कलाकार, उत्तम कथानक असलेला 'स ला ते स ला ना ते' हा 'नात्यांच्या व्याकरणाची गोष्ट' अशी टॅगलाइन असलेला हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे...
Skip to content