Homeचिट चॅटराज्यपालांच्या हस्ते अभिनेते...

राज्यपालांच्या हस्ते अभिनेते प्रेम चोप्रा सन्मानित

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईतील इस्कॉन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते आमदार डॉ. भारती लवेकर, अभिनेते सुनील पॉल, क्रिकेट पंच अनिल चौधरी, डॉ. बसंत गोयल, लेखक मुस्तफा गोम आदींनाही यावेळी भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, बुद्धांजली रिसर्च फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कैलाश मासूम आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.

Continue reading

अंकुश मोरे गौरव कबड्डी १५ डिसेंबरपासून

आंतरराष्ट्रीय पंच, ज्येष्ठ कबड्डी संघटक अंकुश मोरे यांच्या एकसष्ठीपूर्तीनिमित्त गोरेगावच्या अभिनव कला आणि क्रीडा अकॅडेमीने अभिनव क्रीडा मंडळ, एकता क्रीडा मंडळ, वडगाव आणि स्पोटवूट यांच्या सहकार्याने येत्या १५ ते २० डिसेंबर या कालावधीत भव्य जिल्हास्तरीय सुपर लीग आणि बाद...

आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम १३ डिसेंबरला मुंबईत

साहित्याची आवड असणाऱ्या सर्व लेखक, वाचक यांना आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम, येत्या १३ डिसेंबरला कोकण मराठी साहित्य परिषद, दादर शाखा आणि कोमसाप, मुंबई जिल्हा, कोमसाप युवा शक्ती यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई शिवाजी पार्क, दादर यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सानेगुरुजी...

मनोरा बॅडमिंटनः सात्रा, राजपूत, साळुंखे, डेनिस, चांडक, देसाई, गावडे, सामंत विजेते

मुंबईतल्या मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने नुकत्याच खार जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या ११८व्या बॅडमिंटन स्पर्धेत पेहेर सात्रा, साऊजा राजपूत, आरोही साळुंखे, निवान डेनिस, अर्णा चांडक, अजिंक्य देसाई, रुद्रा गावडे, साईराज सामंत यांनी आपापल्या गटात विजेतेपदाचा मान मिळवला. राज्याच्या विविध...
Skip to content