Homeकल्चर +दादर-माटुंगा केंद्रात रंगला...

दादर-माटुंगा केंद्रात रंगला संगीत नाट्यमहोत्सव

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली १६ वर्षे हा महोत्सव आयोजित करत आहे.

संगीत अमृतवेल हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित, आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित, मनोहर जोशी दिग्दर्शित, राम तांबे यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या संगाती नाटकाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. त्यानंतर अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी निर्मित सं. ययाती आणि देवयानी, हे वि. वा. शिरवाडकर लिखित आणि गणेश जोशी दिग्दर्शित, नाटक सादर झाले. जितेंद्र अभिषेकी यांनी मूळ संगीत दिलेल्या या नाटकाच्या संगीत मार्गदर्शक स्मिता करंदीकर आहेत.

संगीत नाट्यमहोत्सवाचा समारोप विद्याधर गोखले नाट्य प्रतिष्ठान निर्मित सं. बावनखणी, हे विद्याधर गोखले लिखित आणि श्रीकांत दादरकर दिग्दर्शित नाटकाने झाला. नाटकाचे संगीतकार यशवंत देव असून संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर यांचे आहे. नृत्य मार्गदर्शन स्मृती तळपदे यांचे असून निर्मिती प्रमुख शुभदा दादरकर आहेत.

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात कलाकारांनी अभिनयाची बाजूही चांगली सांभाळली. मुळात लोकप्रिय असलेल्या नाटकांनी बहार केली. जुनेजाणते कलाकार, अप्रतिम गाणी यांनी दोन्ही प्रयोग चांगलेच रंगले. गाण्यांना वन्स मोअरही मिळाले.  

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content