मुंबई महापालिकेच्या सन २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजासाठी पालिका प्रशासनाकडून मुंबईकर नागरिकांना येत्या १७ जानेवारीपर्यंत ई-मेलने अथवा लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई-मेलवर सूचना कराव्या, असे आवाहन पालिकेने केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई मेलवर शुक्रवार, दिनांक १७ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे. हे अर्थसंकल्पीय अंदाज येत्या ५ फेब्रुवारीला अथवा तत्पूर्वी सादर करण्यात येणार आहे. या अनुषंगाने, लोकसहभागाच्या दृष्टीने मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांना अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी शुक्रवार, १७ जानेवारी २०२५पर्यंत ई-मेल आयडी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in यावर सूचना पाठवाव्यात. ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील त्यांनी शुक्रवार, १७ जानेवारी २०२५पर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत पोहोचेल, अशा बेताने खालील पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ताः
प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय,
चौथा मजला, विस्तारित इमारत,
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय,
महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१.