Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिकेकडून आजपासून...

मुंबई महापालिकेकडून आजपासून पाळीव प्राण्यांची विष्ठाही संकलित

वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदींच्या संकलनासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत आजपासून पाळीव प्राण्यांची विष्ठा आणि इतर विशेष कचऱ्याच्या संकलनाची सेवा सुरू करण्यात आली आहे, तसेच सोमवारपासून ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र सेवादेखील सुरू करण्यात येणार आहे.

पालिकेकडून ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ ही सेवा गेल्या २२ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत काल, २ मेपर्यंत या सेवेसाठी एकूण ३०७ नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये १४८ गृहनिर्माण संस्था, १३५ ब्युटी पार्लर, १७ शैक्षणिक संस्था आणि ७ महिला वसतिगृहांचा समावेश आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर मिळालेला प्रतिसाद, प्राप्त सूचना आणि नागरिकांच्या विनंतीनुसार, पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पाळीव प्राण्यांच्या विष्ठेचे संकलनदेखील या सेवेद्वारे करण्यात येणार आहे. ही सुविधा आजपासून सुरू करण्यात आली आहे.

‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ साठी यापूर्वीच ऑनलाईन लिंक आणि क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्येच पाळीव प्राणी विष्ठा संकलन सुविधेसाठी नोंदणी करता येईल. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform या लिंकवर जाऊन किंवा पालिकेच्या समाजमाध्ययम खात्यावर प्रसिद्ध करण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करून ही नोंदणी करता येईल.

ई-कचरा संकलन सेवादेखील उपलब्ध

मुंबई महानगरामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात ई-कचरा तयार होतो. या धोकादायक स्वरूपाच्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे व पुनर्प्रक्रिया तसेच पुनर्वापर करणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून पालिकेकडून येत्या सोमवारपासून स्वतंत्र ई-कचरा संकलन सेवा सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत निरुपयोगी मोबाईल फोन, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच आणि लहान उपकरणांसारख्या तत्सम सर्व ई-कचऱ्याचे संकलन केले जाईल. ई-कचरा संकलनासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSemTxY-ifCjxU7VW-U7sYpr8JOD_Zj4XKnDB7uVpJyXsk6LxA/viewform?usp=header ही स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर किंवा ई-कचरा संकलनासाठी तयार करण्यात आलेले स्वतंत्र क्यूआर कोड स्कॅन करून या सुविधेसाठी नोंदणी करता येईल. पालिकेच्या समाजमाध्यम खात्यावर हे क्यू आर कोड प्रसिद्ध करण्यात येत आहेत. ई-कचरा सर्वसाधारण कचऱ्यात मिसळल्यामुळे त्यातील शिसे (लीड), पारा (मर्क्युरी), कॅडमियम यासारख्या विषारी घटकांमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ई-कचरा संकलन सेवा सुरू करण्यात येत आहे. ई-कचऱ्याची योग्य पद्धतीने, सुलभ व पर्यावरणस्नेही पद्धतीने विल्हेवाट लावता यावी, हा या सेवेमागचा उद्देश आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content