Thursday, December 12, 2024
Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिका आयुक्तांच्या...

मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्याचे कर 14 वर्षांपासून थकित!

मुंबई महापालिका प्रशासनाच्या कर निर्धारण व संकलक विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली असतानाच मुंबईच्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्याची मागील 14 वर्षांच्या विविध करांची 4.56 लाखांची थकबाकी आजही थकलेलीच आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. गलगलींनी आयुक्त कार्यालयाकडे 29 डिसेंबर 2023 रोजी अर्ज करत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी आपल्या बंगल्यावर वीजसुविधांसाठी केलेल्या खर्चाबाबतचा मागील 5 वर्षांची माहिती माहिती मागितली होती. ही माहिती महिन्यामुसार एकूण वीज आकार, वापरलेले युनिट अशा स्वरूपात मागितली गेली होती.

मुंबई

अनिल गलगली यांचा अर्ज आयुक्त कार्यालयाने डी विभागाच्या जलखात्याकडे हस्तांतरित केला. जल खात्याने अर्ज करनिर्धारक व संकलक खात्याकडे हस्तांतरित केला. नंतर गलगलींना 31 मार्च 2024पर्यंतची माहिती देण्यात आली. 1 एप्रिल 2010पासून 31 मार्च 2023पर्यंतची थकबाकी 3.89 लाख होती. तसेच 1 एप्रिल 2023पासून 31 मार्च 2024पर्यंतचे चालू बिल देयक 67, 278 इतके आहे. यात सर्वसाधारण तसेच जल कराचा समावेश आहे. विशेष म्हणजे तेथे जलमापकविरहित जलजोडणी आहे.

अनिल गलगली यांच्या मते, जलमापक लावणे आवश्यक आहे. आयुक्त असो किंवा सामान्य नागरिक प्रत्येकांनी वेळेवर कर अदा करणेही आवश्यक आहे.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content