Sunday, September 8, 2024
Homeपब्लिक फिगरपंतप्रधान मोदी समाजात...

पंतप्रधान मोदी समाजात पसरवत आहेत द्वेषाचे विष!

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म, अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेस व विरोधी पक्षांना हिंदूविरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी जातीच्या व धर्माच्या नावाने समाजात द्वेषाचे विष पसरवण्याचे पाप करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल केला.

नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदींनी बजरंग बलीच्या नावाने मते मागितली. परंतु बजरंग बलींनी भाजपाच्या डोक्यावर गदा घालून सपशेल आपटले. आताही मोदी धार्मिक मुद्दे पुढे करत प्रभू रामाच्या नावावर मते मागत आहेत. पण प्रभू रामचंद्रही बजरंग बलीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला जागा दाखवतील. खोटी आश्वासने देऊन १० वर्षं सत्ता मिळवली. या १० वर्षांत काय काम केले हे मोदी सांगू शकत नाहीत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्याबद्दल ते बोलू शकत नाहीत, म्हणून प्रत्येक सभेत मोदी धर्माच्या नावावर मते मागत आहेत. हिंमत असेल तर मोदींनी विकासाच्या नावावर मते मागून दाखवावी.

काँग्रेस संविधान बदलून धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन ओबीसींचे आरक्षण हिरावणार असा खोटा प्रचार मोदी करत आहेत. भाजपानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, दलित, अल्पसंख्याक समाजाचा सतत अपमान केला. मोदी सरकारच्या काळातच या समाजावर प्रचंड अत्याचार करण्यात आले. भाजपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पायदळी तुडवले. संविधान बदलाची भाषा भाजपाच करते आणि वरून काँग्रेसवर आरोप करतात याला चोराच्या उलट्या बोंबा  म्हणतात. ओबीसींचे राजकीय आरक्षण भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनीच घालवले आहे. राज्यात मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची फसवणूकही भाजपानेच केली आहे, असेही ते म्हणाले.

इंडिया आघाडीचे सरकार आले की पैसे मिळवण्याचा त्यांचा मनसुबा आहे. सरकार बनाओ, नोट कमाओ, असे मोदी म्हणाले खरे.. पण इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल त्यांनी केली. मोदींची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडली आणि आरोप मात्र इंडिया आघाडीवर करतात. हे मात्र अजब आहे. इंडिया आघाडीचा एकाही जागेवर विजय होऊ देऊ नका, असे जाहीरपणे सांगणे ही हूकूमशाही वृत्ती आहे. पराभव दिसत असल्याने निराशेतून मोदी काहीही बडबड करत आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

Continue reading

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच...
error: Content is protected !!
Skip to content