Saturday, February 8, 2025
Homeपब्लिक फिगरकरवीरचे आमदार पी....

करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज मेंदूतल्या रक्तस्त्रावाने आज निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच ते पाय घसरून पडले होते. या अपघातात त्यांच्या मेंदूला इजा झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

पी. एन. पाटील यांनी तरुण वयापासून काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी २२ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची पक्षसंघटना वाढवण्याचे काम केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षवाढीत मोठे योगदान दिले होते. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी होते.

जिल्हा बँकेचे संचालक आणि अध्यक्ष,गोकुळ दूध संघाचे संचालक म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या सहकार आणि कृषी क्षेत्रात भरीव कार्य केले. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. पी. एन. पाटील हे कार्यकर्ते आणि जनतेमध्ये रमणारे नेते होते. प्रत्येकाच्या अडचणीच्यावेळी हाकेला धावून जाणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांनी कायमच सर्वसामन्य माणूस केंद्रबिंदू माणून राजकारण केले. राजकारणासोबतच, कृषी, सहकार, शिक्षण व क्रीडा क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content