Homeबॅक पेजमनोरा बॅडमिंटनः सात्रा,...

मनोरा बॅडमिंटनः सात्रा, राजपूत, साळुंखे, डेनिस, चांडक, देसाई, गावडे, सामंत विजेते

मुंबईतल्या मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने नुकत्याच खार जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या ११८व्या बॅडमिंटन स्पर्धेत पेहेर सात्रा, साऊजा राजपूत, आरोही साळुंखे, निवान डेनिस, अर्णा चांडक, अजिंक्य देसाई, रुद्रा गावडे, साईराज सामंत यांनी आपापल्या गटात विजेतेपदाचा मान मिळवला. राज्याच्या विविध भागातील २००पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. योनेक्सचे सहकार्य या स्पर्धेला लाभले होते. खार जिमखान्याचे अध्यक्ष गौरव कापाडिया, बॅडमिंटन विभागाचे चेअरमन भरत पारेख, सचिव देवांग दवे, आदित्य गोगटे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. मनोरा बॅडमिंटन अकादमीचे संचालक मनोहर गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बरीच मेहनत घेतली.

स्पर्धेचा अंतिम निकाल

मुली

९ वर्षांखालील- पेहेर सात्रा वि. वि. जुई सुखटणकर, ११ वर्षांखालील- आरोही साळुंखे वि.वि. काव्या कुमारी, १३ वर्षांखालील- अर्णा चांडक वि.वि. श्रावणी खैरनार, १५ वर्षांखालील- रुद्रा गावडे वि.वि. जागृती जाधव.

मुले

९ वर्षांखालील- साऊजा राजपूत वि.वि. जेहान चोक्सी, ११ वर्षांखालील- निवान डेनिस वि.वि. तनय पारेख, १३ वर्षांखालील- अजिंक्य देसाई वि.वि. अद्वय आढाव, १५ वर्षांखालील- साईराज सामंत वि.वि. हेमांशू भाटकर.

दिव्यांग, गतिमंद,अंध , पॅरा पाॅवरलिफ्टिंग बेंचप्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व नागरिक सहाय्य केंद्र विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे दिव्यांग, गतिमंद, अंध, पॅरा पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेस स्पर्धा नुकतीच उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार व पॉवरलिफ्टर कॅ. तमिल सेलवन यांच्या हस्ते झाला. बक्षीस समारंभ संजय बाबुराव शेट्ये, सरचिटणीस महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन, संजय सरदेसाई, सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या उपस्थितीत पार पडला.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे-

बौद्धिक अक्षम (गतिमंद)५३ किलो- १) सौरभ पाटील- सांगली- सुवर्ण, २) इश्कवाकू वशिष्ठ- ठाणे- रौप्य. ५९ किलो- १) रंगम मुजुमदार- मुंबई उपनगर, २) ध्रुव बुद्धदेव- ठाणे. ६६ किलो- १) समर्पित शिंदे- कोल्हापूर, २) अधीरय राव- मुंबई उपनगर, ३) प्रिन्स चतुर्वेदी- ठाणे. ७४ किलो- १) सोहम गवारे- ठाणे, २) ऋषभ जैन- पालघर, ३) यश पंगत- रायगड. ८३ किलो- १) निलेश विजयसिंग- मुंबई उपनगर. ९३ किलो- १) कुणाल पावसकर- मुंबई. महिला गट ४३ किलो- शुक्ला बिडकर- कोल्हापूर.

पॅरा पॉवरलिफ्टिंग (अपंग)- ५३ किलो- १)जितेश सासेकर- रायगड, २) मयूर भाटणकर- कोल्हापूर. ५९ किलो- १) साई किरण- मुंबई, २) विवेक कांबळे- कोल्हापूर, ३) अक्षय पाटील- कोल्हापूर. ६६ किलो- १) कृष्णा आरगडे- सांगली, २) अवधूत सकपाळ- कोल्हापूर, ३) विशाल पाटील- मुंबई, ४) हरीश अल्हात- पुणे. ८३ किलो- १) प्रवीण जगताप- रायगड, २) जयपाल राजाराम- पुणे, ३) सुनील लहाने- परभणी. ९३ किलो- १) दिनेश झा- मुंबई, २) प्रकाश गजरा- पालघर.

दिव्यांग (अंध) पॉवरलिफ्टिंग- ५३ किलो- १) साईप्रसाद जाधव- कोल्हापूर. ६६ किलो- १) हरीश खरात- मुंबई. ९३ किलो- १) दर्शन कांबळे- मुंबई, २) रावसाहेब धरणे- परभणी, ३) आदित्य गायकवाड- मुंबई उपनगर. १०५ किलो- १) उदय भंडारी- नवी मुंबई. महिला गट- ५२ किलो- १) कृष्णा पवार- सातारा, ७६ किलो- १) कल्याणी बागडे- नागपूर.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेहा पावसकर, अध्यक्ष, पॅरा ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र, पंकज चौधरी, सचिव पॅरा ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र, भास्कर सावंत, मैदान बचाव समिती व विश्वस्त ज्ञानेश्वर विद्यालय, संजय माधव, बाबू खोत व सूर्यकांत गर्दे यांचे मोलाचे सहकार्य‌ मिळाले.

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content