Sunday, April 27, 2025
Homeपब्लिक फिगरममतादीदींचा संविधानविरोधी चेहरा...

ममतादीदींचा संविधानविरोधी चेहरा उघड!

पश्चिम बंगालमध्ये 2010नंतर देण्यात आलेली ओबीसी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ओबासी कोट्यातले आरक्षण मुस्लीम समाजाला देण्याच्या त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला जोरदार चपराक बसली आहे. त्यातच न्यायालयाचा निर्णय आपण मानणार नाही असे जाहीर करून ममता बॅनर्जी यांनी आपला संविधानविरोधी चेहरा दाखवून दिला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल व्यक्त केली.

एका जनहित याचिकेवर निकाल देताना 2010 ते 2024 या काळात पश्चिम बंगाल सरकारने दिलेली ओबीसी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये रोहिंग्या मुस्लिमांना आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या घुसखोरांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला आढळून आले. ममता बॅनर्जी सरकारने कोणतेही सर्वेक्षण न करता मुस्लीम समाजातल्या 118 जातींना थेट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून त्यांना आरक्षण दिले. संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नसतानाही ममता बॅनर्जी सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना दिले होते. न्यायालयाने सरकारचा हा निर्णय रद्दबादल ठरवला आहे.

ममता

न्यायालयाने दिलेला निर्णय आपल्याला मान्य नसून यापुढेही याच पद्धतीने ओबीसी आरक्षणातून मुस्लिमांना आरक्षण दिले जाईल, असे जाहीर करून ममता बॅनर्जी यांनी आपला संविधानविरोधी चेहरा दाखवून दिला आहे. यातून तृणमूल काँग्रेस आणि इंडी आघाडी ओबीसी समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. ओबीसी,आदिवासी, दलित समाजाचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा कट भारतीय जनता पार्टी कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.

काँग्रेसने दलित, आदिवासी, ओबीसी समाजाच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला नव्हता. मोदी सरकारने मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देऊन ओबीसींच्या हक्काचे रक्षण केले. न्यायालयाचा अवमान, संविधानाचा अपमान आणि पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वासघात करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे तुष्टीकरणाचे राजकारण यापुढे जनता खपवून घेणार नाही. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तेथील जनता 30पेक्षा अधिक जागी भारतीय जनता पार्टीला विजयी करून ममता बॅनर्जींना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांना नुकत्याच एका कार्यक्रमात इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी दलित, मागास वर्गाच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केले हे मान्य करावे लागले, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले आहे.

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content