Homeचिट चॅटमहाराष्ट्र काँग्रेसतर्फे उद्या...

महाराष्ट्र काँग्रेसतर्फे उद्या मराठवाड्यात प्रभातफेरी

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा ७५वे वर्ष असून हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व स्वातंत्र्याचे स्मरण करावे या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने उद्या, १ मे रोजी महाराष्ट्रदिनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ध्वजारोहणानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभापर्यंत प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील जनतेच्या लढ्यानंतर आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. या ऐतिहासिक लढ्याला यावर्षी ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. मराठावाडा मुक्तीसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. त्यासाठी एक समितीही स्थापन केली होती. मात्र राज्यातले सरकार बदलताच सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा विसर पडला. काँग्रेसने वारंवार शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाची आठवण करून दिली. मात्र सत्तेची मलई खाण्यात गुंग असलेल्या या सरकारला मराठवाड्यातील जनतेच्या या लढ्याची व मराठवाडा मुक्ती संग्रामाची जाणीव नाही. काँग्रेसनेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा, नव्या पिढीला मराठवाडा मुक्ती संग्रामलढ्याच्या इतिहासाची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content