Homeडेली पल्समहाबलीपुरमला राष्ट्रीय मत्स्य...

महाबलीपुरमला राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन संमेलन संपन्न!

वैज्ञानिक संशोधन तसेच तंत्रज्ञानविषयक उपाययोजनांमुळे गेल्या काही वर्षांत मस्त्यव्यवसाय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती झालेली दिसते. यावर्षीच्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन 2023 निमित्त आयोजित संमेलनात आधुनिक तंत्राचा स्वीकार करण्याप्रती आणि त्यातून मस्य उत्पादन वाढवण्याप्रती मस्त्यपालक शेतकरी, स्टार्ट अप उद्योग, नवोन्मेष यांचा समर्पित भाव दिसून आला.

केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील मत्स्यपालन विभागाने सर्व हितधारकांच्या सहकार्याने महाबलीपुरम येथे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन 2023 संमेलन आणि स्टार्ट अप परिषदेचे आयोजन केले होते. 10 जुलै 2023 रोजी सुरु झालेल्या या संमेलनाचा समारोप काल 11 जुलै 2023 रोजी तमिळनाडूतील महाबलीपुरम या ऐतिहासिक शहरात झाला.

राष्ट्रीय मस्त्य शेतकरी दिन 2023 निमित्त आयोजित संमेलनाने संपूर्ण देशाला मच्छिमार तसेच मस्त्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड योगदान तसेच शाश्वत मत्स्यव्यवसाय विकासाप्रती त्यांचे समर्पण यांचा सन्मान करण्याची संधी उपलब्ध करून दिली. जबाबदार पद्धती अनुसरून तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील क्षमतेचा वापर करून आपण समृद्ध भविष्याची सुनिश्चिती तसेच अन्न सुरक्षेत वाढ करू शकतो आणि त्यातून आपल्या देशाच्या समग्र विकासासाठी योगदान देऊ शकतो असा विचार या संमेलनाने दिला.

या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री पुरषोत्तम रुपाला यांनी केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्या उपस्थितीत संबंधित राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रशासनांच्या मंत्र्यांशी संवाद साधून त्यांना मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या पीएमएमएसवाय, एफआयडीएफ, आणि केसीसी या केंद्र सरकारच्या योजनांचा परिणामकारक वापर करून घेण्याचे निर्देश दिले. मच्छिमार, मत्स्य शेतकरी तसेच इतर संबंधित भागधारकांच्या शाश्वत भविष्यासाठी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा स्वीकार करण्याबाबत देखील केंद्रीय मंत्र्यांनी सूचना दिल्या.

मत्स्य क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. मस्त्य क्षेत्राची प्रगती तसेच उद्योजकतेमध्ये वाढ, व्यवसाय नमुन्यांचे विकसन, व्यवसाय करण्यातील सुलभतेला, नवोन्मेषाला तसेच स्टार्ट अप्स, इन्क्युबेटर्स इत्यादींसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकाला योगदान देता येण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरणाची जोपासना करतानाच मस्त्यव्यवसाय क्षेत्रात अत्याधुनिक अभिनव संशोधनांचा समावेश करून घेण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content