Homeडेली पल्सआज माघी श्री...

आज माघी श्री गणेश जयंती!

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते.

महत्त्व: गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात. म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते. या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्त लाभ होतो.

गणेश जयंतीला गणेशत्त्वाचा लाभ होण्यासाठी करावयाची उपासना: या दिवशी गणपतीचा भावपूर्ण नामजप ३ ते ९ माळा करण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्ती आणि चैतन्य यांचा अधिक लाभ होतो. गणपती अथर्वशीर्ष म्हटल्यासही लाभ होतो.

शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात?: गणपती हा दिशांचा अधिपती आहे. गणेशपूजन केल्यामुळे दिशा मोकळया करतो. त्यामुळे ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती पूजास्थानी येऊ शकते. गणपती (नाद) भाषेचे देवांच्या (प्रकाश) भाषेत रूपांतर करतो. त्यामुळे मनुष्याच्या प्रार्थना देवतांना कळतात. गणपती हा विघ्नहर्ता आहे.

गणपतीचे वाहन: वृ-वह म्हणजे वहाणे यापासून वाहन हा शब्द बनला आहे. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या-त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन. पण, त्याची इतरही वाहने आहेत. उदा. युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्‍वराचे वाहन मोर आहे.

श्री गणेशाची उपासना म्हणून प्रतिदिन खालील गोष्टी कराव्यात: 

1. अथर्वशीर्षाचे पठण: आपल्या वाणीत चैतन्य असले की, आपल्या बोलण्यात गोडवा येतो. अथर्वशीर्षाच्या पठणाने आपले उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीत गोडवा येतो. यासाठी अथर्वशीर्षाचे पठण करावे. 

2. अधिकाधिक प्रार्थना: आपण ज्या भाषेत बोलतो, तिला नादभाषा म्हणतात. इतर देवतांपेक्षा श्री गणपतीला आपली भाषा अधिक कळते. म्हणून अधिकाधिक प्रार्थना करून त्याची कृपा संपादन करावी.

3. मानसपूजा: मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा. मानसपूजेमुळे मनाला उत्साह मिळतो. याला कोणतेच बंधन नसते. आपल्याला या पूजेद्वारे आपल्या आवडीची वस्त्रे, आवडीची वस्तू देता येते. आपण मनाने सतत श्री गणपतीच्या सहवासात राहून आनंदी राहू शकतो.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्री गणपति’

संपर्क क्र. 9920015949

Continue reading

इराण-अमेरिकेतला तणाव आणि इतर अनेक संक्षिप्त…

इराण आणि अमेरिकेतला तणाव वाढला आहे. इराणचा १४ मुद्द्यांचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला. अमेरिकेच्या ९ मुद्द्यांच्या प्रस्तावाला इराणने हे उत्तर दिले होते. आपल्या अटी मान्य झाल्यावरच आण्विक कार्यक्रमावर चर्चा करण्याची तयारी इराणने दाखवली होती. दरम्यान, एडनच्या आखातात हल्लेखोरांनी एका...

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे पत्रकार अभय मोकाशींचे निधन

इंग्रजी पत्रकारितेत आपल्या शोधपत्रकारितेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे काल, शनिवारी रात्री उशिरा मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षात पदार्पण करण्यास जेमतेम एक तास उरला असताना...

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....
Skip to content