Homeकल्चर +'फ्रीडम मंथ'मध्ये ऐका...

‘फ्रीडम मंथ’मध्ये ऐका डॉ. सदानंद मोरेलिखित “लोकमान्य ते महात्मा”!

विसाव्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तेजस्वी पर्व. या पर्वात स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्त्वाची मशाल लोकमान्य टिळकांच्या हातातून महात्मा गांधींच्या हाती सोपवली गेली. या महत्त्वपूर्ण घडामोडीचा विश्लेषक आढावा घेणारा बहुमोल द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे डॉ. सदानंद मोरेलिखित ‘लोकमान्य ते महात्मा’. हा अत्यंत मौल्यवान असा संपूर्ण ग्रंथ स्टोरीटेल मराठीने आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऑडिओबुकमध्ये इतिहासप्रेमी साहित्यरसिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे स्टोरीटेलने ‘फ्रीडम मंथ’ ही विशेष योजनाही यानिमित्ताने सुरू केली आहे.

गेल्या काही दशकांत समाजसुधारक हे अलिखित पद जसे कालबाह्य झाले, तसेच सामाजिक विचारवंतांची परंपराही खंडित झाली आहे. केवळ इतिहासाचे आकलन करण्यापेक्षा समाजातील सर्व घटकांमध्ये घडलेल्या घटना-घडामोडींचा एकत्रित विचार करण्याची क्षमता असणारे विचारवंतही एका हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढेच आहेत. त्यामध्ये अग्रणी असण्याचा मान डॉ. सदानंद मोरे यांच्याकडे जातो. गेल्या पस्तीस वर्षांमध्ये संतपरंपरेचा अभ्यास करून त्यांनी जो अन्वयार्थ लावला, तो त्यांच्यातील अभ्यासकाचे दर्शन घडवणारा आहे.

भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य उत्सवानिमित्त ‘स्टोरीटेल’ने सब्स्क्रिप्शन प्लानमध्ये ‘स्टोरीटेल सिलेक्ट फ्रीडम ऑफर’ जाहीर करून स्वातंत्र्यप्रेमी साहित्यरसिकांचा आनंद द्विगुणित केला आहे. ‘स्टोरीटेल इंडिया’चे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ म्हणतात की, आपला अमृतमहोत्सवी ‘स्वातंत्र्य उत्सव’ स्टोरीटेलला अविस्मरणीय करायचा आहे. महाराष्ट्राचे चिकित्सक विचारवंत जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरेलिखित स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा घेतलेला वेध ‘लोकमान्य ते महात्मा’ हा संपूर्ण ग्रंथ आम्ही ऑडिओबुक मध्ये प्रकाशित करीत आहोत, जो तुम्ही कधीही, कुठेही आणि कितीही वेळा ऐकू शकणार आहात.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content