Sunday, April 27, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसवाद निर्माण करून...

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न त्याने केला. कामराच्या हास्यव्यंग्यावर टिप्पणी करताना फडणवीस म्हणाले की, कामराला माहीत हवे की, राज्यात कोण खुद्दार आणि कोण गद्दार! हे २०२४ च्या निवडणुकीतून राज्यातील जनतेने ठरवले आणि हिन्दूहृदयसम्राट ठाकरे यांच्या विचाराचा वारसा कुणाकडे आहे, हेही जनतेने ठरवले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांच्यावर कॉमेडी करण्याच्या नावाखाली अपमानास्पद व्यंग्य करून अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करणाऱ्या कुणाल कामरा याच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेur मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले. त्याआधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या हौद्यात जमा होऊन गदारोळ केला आणि कामराविरुद्ध कारवाईचा आग्रह धरल्यानंतर पाच मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

कामरा याने एकनाथ शिन्दे यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल सभागृहात अर्जुन खोतकर यांनी मुद्दा उपस्थित केला. सभागृहाबाहेरही कामरा याच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. मख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हास्यव्यंग्य किंवा अभिव्यक्ती याचा पुरस्कार करणारे आपण सर्व आहोत आणि अशा व्यंग्यातून त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा आपण प्रयत्न केलेला नाही. पण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जात असेल तर ते मान्य केले जाणार नाही. कामरा यांच्या समर्थनासाठी उभे राहिलेल्या विरोधी पक्षातील काही सदस्यांवर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कामरा याची शिन्दे यांच्यावरील टिप्पणी करत खिल्ली उडवणारी कविता प्रसारित झाली आणि विरोधकांमधील एकाने ट्विट केले, एकाची क्लिप आली. मग दुसऱ्याची क्लिप आली. मग प्रश्न असा येतो की या कामराला सुपारी दिली गेली होती का?

फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी जे छोटे लाल संविधान घेऊन फिरतात, त्याच्याबरोबरचा फोटो या कामराने ट्विट केला आहे. संविधानाने प्रत्येकाला दिलेले स्वातंत्र्य अमर्याद नाही. तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता तेव्हा ते स्वातंत्र्य मर्यादित होते. त्याने अपमानजनक शब्द वापरले आहेत. त्याने माझ्यावर किंवा शिन्देसाहेबांवर कविता करावी ती आम्हीही ऐकू. पण अपमानजनक काम सुपारी घेऊन केले तर कारवाई केलीच जाईल. त्याच्यावर कारवाई केली की मग संविधानाचे स्वातंत्र्य गेले असे म्हणत छात्या बडवू नका. विनाकरण प्रसिद्धीसाठी सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल, कारण महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचे काम करणारे हे लोक आहेत. त्याचपद्धतीने त्या रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांवर घाणेरडे शब्द वापरले तर योग्य नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार सहन केला तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. सध्या लेफ्ट, लिबरल यांचे उद्देश एकच आहेत आणि ते म्हणजे देशातील मानके, संस्थांवरचा विश्वास उडवणे. पण त्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये म्हणून कामरा याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, हे मी सभागृहाला आश्वस्त करतो.

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content