प्रिय वाचक,
किरण हेगडे लाईव्ह, आपल्यासमोर लवकरच नव्या स्वरूपात सादर होत आहे. याची अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केएचएल, अनियमितरित्या सुरू आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण लवकरच नव्या स्वरूपातील 'किरण हेगडे लाईव्ह'ला प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो.

धन्यवाद.

किरण हेगडे, संपादक

प्रिय वाचक,

किरण हेगडे लाईव्ह, आपल्यासमोर लवकरच नव्या स्वरूपात सादर होत आहे. याची अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केएचएल, अनियमितरित्या सुरू आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण लवकरच नव्या स्वरूपातील 'किरण हेगडे लाईव्ह'ला प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो. धन्यवाद. किरण हेगडे, संपादक

Homeकल्चर +जावेद अख्तर, अनुपम...

जावेद अख्तर, अनुपम खेर यांनी अनुभवला प्रदीप चंद्रांच्या छायाचित्रणाचा प्रवास!

ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप चंद्रा, ज्यांचा पन्नासहून अधिक वर्षांचा गौरवशाली कारकिर्दीचा प्रवास आहे, यांचे खास छायाचित्र प्रदर्शन ‘बॉम्बे थ्रू द आईज ऑफ प्रदीप चंद्रा’ मुंबईतल्या जुहूमधील फ्लोअर वन येथे सध्या सुरू आहे. या प्रदर्शनात चित्रपट, संगीत, कला, साहित्य, व्यवसाय आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींचे त्यांनी टिपलेले उल्लेखनीय क्षण मांडण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन गीतकार जावेद अख्तर आणि अनुपम खेर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये निर्माता आनंद पंडित, समाजसेवक डॉ. अनील काशी मुरारका, अभिनेते दीपक काझीर आणि दीपक पराशर, कलाकार प्रकाश बाळ जोशी, चरण शर्मा आणि विनोद शर्मा, कलाप्रेमी परवेज दमानिया, क्युरेटर किसलय वोरा आदी मान्यवरांचा समावेश होता. हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी २१ मे २०२५ पर्यंत खुले राहणार आहे.

“आपण सगळ्यांनाच माहीत आहे की तो आपल्या कामात किती उत्तम आहे, पण त्याचं खरं वेगळेपण म्हणजे त्याचा अनुभव किती मोठा आहे. या फोटोंमध्ये जे लोक तरुण दिसत आहेत, त्यातले अनेक आता तरुण राहिले नाहीत. हे फोटो जवळपास ३०-४० वर्षांपूर्वीचे आहेत. आणि वहिदा रहमान यांचा फोटो, जो त्याचा पहिला फोटो आहे, तो कदाचित ६० वर्षांपूर्वीचा असावा, कारण मला आठवतं, जेव्हा हा चित्रपट आला होता, तेव्हा मी २० वर्षांचाही नव्हतो.. मी बहुतेक १७-१८ वर्षांचा असेन. इतक्या इतक्या वर्षांनंतरही या क्षेत्रात कायम राहणं सोपं नाही. मी त्याला शुभेच्छा देतो आणि आशा करतो की तो नेहमीप्रमाणे असेच सुंदर क्षण टिपत राहो”, अशा भावना जावेद अख्तर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

अनुपम खेर म्हणाले की, “प्रदीप हा एक आयकॉनिक फोटोग्राफर आहे. माझ्या स्ट्रगलच्या दिवसांपासून आजपर्यंत, तो काहीच बदललेला नाही. ना दिसण्यात, ना विचारांत. त्याच्या फोटोंवरून कळतं की तो फक्त चेहराच नाही, तर आत्माही टिपतो — फक्त ग्लॅमर नव्हे, आणि ते खूपच आश्चर्यकारक आहे. मी इथे येऊ शकलो याचा मला खूप आनंद आहे.”

या प्रदर्शनात चित्रपट, संगीत, साहित्य, कला, व्यवसाय आणि राजकारण क्षेत्रातील अजरामर व्यक्तिमत्वांची छायाचित्रं सादर केली जातील. प्रदीप चंद्रा यांचा फोटोग्राफीचा प्रवास त्यांच्या भावाकडून भेट मिळालेल्या ‘शुअर शॉट’ कॅमेऱ्यापासून सुरू झाला. फिल्मिस्तान स्टुडिओच्या वेशीतून शाळा बुडवून चित्रपटसृष्टीची जादू पाहण्यासाठी धावणाऱ्या त्या मुलाने लवकरच फोटोग्राफी आपल्या जीवनध्येयात बदलली. “बात एक रात की” चित्रपटाच्या सेटवर घेतलेले वहिदा रहमान यांचे छायाचित्र ‘फिल्मफेयर’मध्ये पूर्ण पान छापले गेले आणि तो क्षण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फोटोग्राफीसाठी वाहण्याचा निर्णय घेतला, असे ते सांगतात. मुंबईच्या आत्म्याचं, भारताच्या बदलत्या स्वरूपाचं त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून हळुवार चित्रण केलं आहे. चित्रपटसृष्टीचा झगमगाट असो वा मुंबई दंगलींतील गोंधळ किंवा कमाठीपुऱ्यातील निरागस मुलांचे शांत जीवन. प्रत्येक फ्रेममध्ये मानवी भावना आणि वास्तवाचं दर्शन घडतं.

गुरगाव येथील म्युझिओ कॅमेरा सेंटर फॉर फोटोग्राफिक आर्ट येथे सुरू झालेलं हे भ्रमंती प्रदर्शन ‘बॉम्बे थ्रू द आईज ऑफ प्रदीप चंद्रा’ आता मुंबईत दाखल झालं आहे. या प्रदर्शनात प्रदीप चंद्रा यांनी टिपलेली चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची छायाचित्रं पाहायला मिळतात. अशोक कुमार, दिलीप कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, वहिदा रहमान, हेमा मालिनी, नादिरा बब्बर, शबाना आझमी, जावेद अख्तर, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, तब्बू, करिना कपूर खान, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, सुष्मिता सेन आणि हृतिक रोशन यांचा यात समावेश आहे. संगीत क्षेत्रातील हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अल्ला रख्खा, उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद तौफीक कुरेशी, झुबिन मेहता आणि कवी-गीतकार गुलजार यांनादेखील त्यांच्या कॅमेऱ्याने टिपले आहे. या छायाचित्रांमधून अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकणारे क्षण जिवंत होतात. कला आणि साहित्य क्षेत्रात एम. एफ. हुसेन, एस. एच. रझा, एफ. एन. सूझा, बोस कृष्णमाचारी आणि लेखिका-स्तंभलेखिका शोभा डे यांची छायाचित्रंही प्रदर्शनाचा भाग आहेत. भारतीय उद्योग आणि नेतृत्त्वाचे प्रतीक रतन टाटा, धीरूभाई अंबानी तसेच राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी उपपंतप्रधान लाल कृष्ण अडवाणी यांचीही छायाचित्रे या खास प्रदर्शनात पाहायला मिळतात. फिल्म निर्माता आनंद पंडित आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रितीश नंदी यांचादेखील यात समावेश आहे.

प्रदर्शनाविषयी बोलताना प्रदीप चंद्रा म्हणतात की, “हे प्रदर्शन फक्त एक कार्यक्रम नाही, तर माझ्यासाठी घरी परतण्यासारखं आहे. माझ्या आयुष्यातील मेहनत, आवड आणि आठवणी यांचं हे प्रतिक आहे. प्रत्येक छायाचित्रामागे एक कथा आहे आणि त्या सगळ्या मिळून माझ्या जीवनप्रवासाचं प्रतिबिंब दाखवतात.” हे प्रदर्शन त्यांचे गुरू, दिवंगत प्रितीश नंदी यांना समर्पित आहे, ज्यांचे यावर्षी सुरुवातीस हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. “प्रितीश हे दृश्यकलेचं सामर्थ्य ओळखणारे पहिले व्यक्ती होते. त्यांनीच मला फ्रेमच्या बाहेर पाहण्यास शिकवलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझं फक्त करिअर नाही तर माझं जग पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला,” असं ते नमूद करतात. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’, ‘फिल्मफेयर’, ‘द इलस्ट्रेटेड वीकली’, ‘द इंडियन एक्सप्रेस’, आणि ‘द वीक’ यांसारख्या प्रमुख प्रकाशनांमध्ये काम करताना, प्रदीप चंद्रा यांनी फक्त कामापुरतं नव्हे तर काळात ठसठशीत ठसा उमटवणारी दृश्यकथा साकारली. दो रास्ते चित्रपटासाठी स्थिर छायाचित्रकार म्हणून काम असो, काँग्रेस शताब्दी सोहळ्याचं दस्तावेजीकरण असो किंवा शेखावाटीमधील ऐतिहासिक हवेल्यांचं चित्रण.. त्यांच्या प्रत्येक फ्रेममध्ये असते एक नितांत संवेदनशीलता….

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content