Homeमाय व्हॉईसबाबा सिद्दीकी हत्त्या...

बाबा सिद्दीकी हत्त्या प्रकरणात पोलिसांचे घूमजाव?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येस एक महिना पूर्ण होत असताना पोलिसांनी अचानक घुमजाव केल्याचे दिसतंय! कालच पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, “सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारप्रकरणी पकडलेल्या संशयिताच्या फोन सांभाषणात तो बिष्णोईचा भाऊ अनमोल याच्याशी संभाषण करत असतानाची एक टेप त्यांनी हस्तगत केली असून त्यातील आवाज नेमका अनमोलचाच आहे की नाही हे समजल्यानंतरच आम्ही सिद्दीकी प्रकरणात त्याचा हात होता की नाही याबाबत निष्कर्ष काढू.” (हुश्श.. हुश्श..)

एप्रिल महिन्यात सलमानच्या घराच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळची टेप तपासण्यासाठी पाठवायची मागणी करायला पोलिसांना तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागावा, यह कुछ हजम नहीं हो रहा! सिद्दीकींची हत्त्या झाली नसती तर न्यायवैद्यक तपासणीची गरजच नव्हती काय? मग सिद्दीकी यांचे संशयित मारेकरी व अनमोलमधील संभाषणाची तपासणी करण्याआधीच सिद्दीकींच्या हत्त्येनंतर अगदी दुसऱ्या दिवसापासून पोलिसांनी ‘बिष्णोई’ राग आळवायला का सुरुवात केली? सिद्दीकींच्या हत्त्येमागील बिष्णोई हे एक कारण असू शकेल. नाही असे नाही. परंतु तपासाचा खेळखंडोबा झालेला पाहता ते एकमेव कारण असेल असे सूतराम वाटत नाही. दहा दिवसांनी पोलिसांनी आम्ही एसआरए अँगलचाही विचार करत आहोत असे स्पष्ट केले होते. त्यादृष्टीने काही चौकशीही केली असल्याचे समजते.

एसआरएप्रकरणी झिशान सिद्दीकीही एका प्रकरणात आरोपी आहे. बांद्रा पूर्व व बांद्रा पश्चिममध्ये एसआरए व इतर अनेक बांधकामांचे शेकडो प्रश्न आहेत. बांद्रा कुर्ला संकुलाजवळच असल्याने दोन्हीकडील भूखंडांचे भाव आकाशाला भेदून वर वरच जात आहेत. आणि पैसा आहे म्हटला की गुन्हा होणारच आणि तो कोटीच्या कोटी उड्डाणे करत असेल तर कुणाचा कोथळा बाहेर काढायला कोणीही मागेपुढे पाहत नाही हा जगाचा नियम आहे. एसआरएची समस्या जशी पूर्व बांद्रा येथे आहे तशीच ती समस्या पश्चिम बांद्र्यातही आहे. परंतु थोडा फरक आहे. पूर्व येथे जुन्या इमारती व जुन्या चाळी अनेक आहेत. पश्चिम येथे छोटी छोटी घरे आहेत व घराच्या आजूबाजूला मोकळी जागा आहे. अशी पाच-सहा घरे मिळूनही एक टोलेजंग इमारत होऊ शकते. अशा इमारती उभ्याही राहिलेल्या आहेत. स्वतः सिद्दीकी राहत होते ती इमारतही अशीच उभी राहिलेली आहे.

खरंतर बांद्रा पश्चिमेला अनेक प्रभावशाली राजकीय नेते राहतात. त्यांच्या जोडीला अर्ध्याहून अधिक हिंदी सिनेमातील ‘तगडे’ कलाकार राहतात. समुद्राच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या वाऱ्याच्या मंदमंद झुळकी, लाटांचा छ..त अशा आवाजाने ज्यांना शायरी सुचते असे नामवंत शायर तसेच काही उद्योगपती या परिसरात राहतात. अशा सर्वगुणसंपन्न विभागात खूनखराबा, गो्लि्योंकी बरसात कुछ तो लोच्या है! पोलिसांच्या दृष्टीने हाय सिक्युरिटी झोन, शिवाय प्रत्येकाची खासगी व सरकारी सुरक्षा असे असताना खुलेआम गोळीबार वा हल्ला हे पोलिसांना आणि सर्व संबंधित यंत्रणाना शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे.

बांद्र्याच्या या दोन्ही भागात काही तास फेरफटका मारल्यानंतर असे दिसून आले की, दोन्ही ठिकाणचा सामान्य माणूस थोडासा हादरला आहे. मात्र सुस्थितीत असलेला नोकरदार व उद्योजक मात्र दबक्या आवाजात नेमके, परंतु स्फोटक बोलतात. हे सर्व खेळ राजकीय नेते व गुंड टोळ्यांचे आहेत. ते त्यांच्याच माणसांच्या डोक्यावर चढल्याने काटा काढत आहेत. या संबंधात बोलताना एक माजी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणाले की, “या तपासाचे कुठल्याही यंत्रणेकडे काम देऊ नका. त्यापेक्षा बांद्रा पूर्व व बांद्रा पश्चिम येथील प्रत्येकी तीन-तीन आमदार घ्या आणि त्यांची ‘नार्को’ करा. अवघ्या पाच-सहा दिवसात सर्व खेळ खल्लास होईल.” पण असे कोणी करणार नाही. पश्चिम बांद्रा परिसरातील विद्यमान आमदारांना बाबा सिद्दीकींचे गैरप्रकार माहित नसणार असे होणारच नाही. याबाबत त्यांनी काही लेखी तक्रार वगैरे काही करून प्रकरण तडीस नेण्याचा प्रयत्न केला होता की नाही हे समजायला मार्ग नाही. मात्र त्यांनी तक्रार केली असती तर ते पोलिसांनी सांगितले असते.

बाबा सिद्दीकी हत्त्याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची संख्या २०च्या आसपास गेली आहे. त्यातील सर्वाधिक संशयित पुणे शहर व ग्रामीण भागातून आलेले आहेत. मात्र पुणे पोलिसांच्या दप्तरी त्यांची अट्टल गुन्हेगार म्हणून नोंद नाही. कुणाच्या तरी राजकीय दबावाने पोलीसयंत्रणा या तरुणांना ताब्यात घेत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी या संशयित आरोपींकडून काही पिस्तुले व पुंगळ्या जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या पुंगळयांपैकी काही पुंगळ्या यंत्रणांच्या पिस्तुलात वापरल्या जातात अशी माहिती माहितीगारांनी दिली. यंत्रणा जेव्हा पुंगळ्या देतात तेव्हा त्याचा हिशेब व कुणाला दिल्या याची माहितीही संबंधित यंत्रणेकडे असते. यावरून यंत्रणेतील फितूरांचा शोध घेता येऊ शकतो. थोडक्यात पोलिसांनी दिलेल्या या माहितीबाबतही संशय घेता येईल अशी परिस्थिती आहे.

दरम्यान, सलमानला तर फोनवरून धमक्या येतच आहेत. त्यात आता अभिनेता शाहरुख खान याची भर पडलेली आहे. मात्र या फोन धमक्यांची आता मजा वाटते. ती अशासाठी की, फिल्म पत्रकारिता करणाऱ्यांनासुद्धा या अभिनेत्यांचे फोन नंबर मिळवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. आणि इतके करूनही फोन नंबर मिळाला तरी तो त्या अभिनेत्याचा नसतोच. त्याची प्रसिद्धी सांभाळणाऱ्या माणसाचा वा एजन्सीचा असतो. बरेच प्रयत्न केल्यानंतर ते फोन वर येत असतात. आणखी एक गोम आहे की, हे अभिनेता स्वतः याबाबत कधीच पोलिसांकडे तक्रार करत नाहीत (काही अपवाद आहेत). अखेर “when all options fail, violence becomes the only language” हेच खरे मानावे लागते. आणि मुख्य हल्लेखोर शोधताना पोलिसांचा घामटा निघतो कारण “A good hitman is invisible like ghost in the night.”

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

पुन्हा छत्रपतींचा एक नवा पुतळा प्रस्तावित!

दोनच दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे बोरीबंदर) या रेल्वेसंकुलात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा केली. बोरींबंदर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास होत आहे, अनेक नवीन गोष्टी उभ्या राहत आहेत हे मान्य आहे व...

मंत्रालय परिसरासारखे चकाचक रस्ते इतर ठिकाणी नकोत का?

कालच्या शनिवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मंत्रालयजवळील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये गेलो होतो. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम काहीसा लवकर संपल्याने हाताशी बराच वेळ होता. म्हटलं.. एकेकाळी दररोज या परिसरात येत होतो, जरा उसंत मिळाली आहे, या परिसरातील 'प्राणवायू' प्राशून घरी जाऊया.. कारण,...

अहो ऐकलं का? ठाणे रेल्वेस्थानकातली घाण छप्पर नसल्यामुळे…

बोरींबंदर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हे रेल्वेस्थानक छप्पर असलेलं स्थानक असल्याने तेथे भरपावसातही तुलनेने स्वच्छता असते, फलाटावर चिखलयुक्त काळे पाणी नसते, उलट ठाणे रेल्वेस्थनकावर छप्परच नसल्याने हजारो प्रवाशांच्या पायाने जी घाण येते तीच असते, असा बचावात्मक पवित्रा रेल्वेच्या...
Skip to content