Homeटॉप स्टोरीदिशा सालियन चौकशीप्रकरणी...

दिशा सालियन चौकशीप्रकरणी विरोधकांचा मनसुबा फडणवीसांनी उधळला?

दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या चौकशीबाबत राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्षांचा मनसुबा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धुळीस मिळवल्याची चर्चा सध्या चालू आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू असून यामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून करण्याची घोषणा केली. याकरीता सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार मागणी केली होती. त्याचवेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी याला तीव्र विरोध केला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली असून हा मृत्यू अपघाती असल्याचा  निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची गरज नाही. राजकीय हेतूपोटी ही चौकशी केली जात असल्याचा आरोपही विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून केला गेला होता. विरोधकांचा हा आरोप खोडून काढताना फडणवीस यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेलेच नव्हते असे ठासून सांगितले होते.

फडणवीस

शुक्रवारी राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा दिल्लीला पोहोचली होती. या यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत पोहोचले होते. तेथे माध्यमांशी बोलताना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर सोमवारी विधानसभेत हक्कभंग दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. दिशा सालियनच्या मृत्यूचे चौकशी सीबीआयने केल्यानंतरही फडणवीस यांनी सभागृहाची दिशाभूल करत हा तपास सीबीआय केलाच नव्हता असे सांगितले. त्यामुळे आपण त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे ते म्हणाले.

एकीकडे या घडामोडी होत असतानाच उपमुख्यमंत्री फडणवीस मात्र भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात पोहोचले होते. श्रद्धांजली वाहिल्यानंतर तेथूनच ते दिल्लीला रवाना झाले. ते अचानक का दिल्लीला गेले याबद्दल वेगवेगळी चर्चा केली जात होती. मात्र शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सीबीआयने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास आम्ही केलाच नसल्याचे स्पष्ट केले. हे प्रकरण तपासासाठी आपल्याकडे सोपवण्यातच आले नाही. त्याचप्रमाणे आमचा निष्कर्ष म्हणून ज्या काही बातम्या माध्यमे देत आहे किंवा दिल्या आहेत त्या तद्दन खोट्या आहेत, असेही सीबीआयकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून या विषयावर मौन बाळगणाऱ्या सीबीआयकडून ही भूमिका मांडण्यामागे फडणवीस यांचा दिल्ली दौरा कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content