Homeन्यूज ॲट अ ग्लांसइस्रायलमधल्या 'मिनी इंडिया'वर...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील ‘डिमोना’ आणि ‘अराड’ या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या ‘नतान्झ’ आण्विक केंद्रावरील हल्ल्याची ‘प्रतिक्रिया’ असल्याचे जाहीर केले. या युद्धात प्रथमच इराणची क्षेपणास्त्रे इस्रायलच्या अणुऊर्जा केंद्राच्या परिसरातील हवाई संरक्षणप्रणालीला भेदण्यात यशस्वी ठरली. हे या संघर्षाचे नाट्यपूर्ण नवे वळण आहे.

डिमोना हे शहर इस्रायलच्या ‘शिमोन पेरेझ नेगेव्ह न्यूक्लिअर रिसर्च सेंटर’पासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. या शहरात जगभरातून स्थलांतरित झालेल्या भारतीय यहुद्यांची मोठी वस्ती असल्याने त्याला ‘मिनी-इंडिया’ असेही म्हटले जाते. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी या हल्ल्याला ‘युद्धगुन्हा’ संबोधत जगभरातील नेत्यांना अमेरिका-इस्रायलच्या इराणविरोधी युद्धात सहभागी होण्याचे आवाहन केले. “जर इराण संपूर्ण जगाला धोका निर्माण करतो याचा पुरावा हवा असेल, तर गेल्या ४८ तासांनी तो दिला आहे,” असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) डिमोनाच्या अणुकेंद्राला कोणतीही इजा झाली नाही व किरणोत्सर्गाची पातळी सामान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव विस्फोटक

होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव आणखी विस्फोटक बनला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शनिवारी उशिरा इशारा दिला की, इराणने ४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली न केल्यास अमेरिका इराणचे विद्युत केंद्र “उद्ध्वस्त” करेल, त्याची सुरुवात सर्वात मोठ्या केंद्रापासून होईल. या धमकीला उत्तर देताना इराणने सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनी “शत्रू” वगळता सर्वांसाठी खुली आहे; मात्र इराणच्या विद्युत केंद्रांवर हल्ला झाल्यास संपूर्ण खाडीतील अमेरिकन ऊर्जा पायाभूत सुविधा “कायमस्वरूपी नष्ट होतील”.

इराण

व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध

जागतिक कच्च्या तेलाचे दर आधीच प्रति बॅरल $ ११२वर पोहोचले असून अमेरिकेत पेट्रोलचे दर गेल्या काही आठवड्यांत प्रति गॅलन ९३ सेंटने वाढले आहेत. त्यात अशा टोकाच्या बातम्या अस्थिरता आणि महागाई वाढवत आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान, संयुक्त अरब अमिराती, बहरीन यांच्यासह २२ देशांनी संयुक्त निवेदन जारी करून इराणने केलेल्या व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून होर्मुझ पुन्हा खुली करण्याची मागणी केली आहे.

ब्रिटिश नौदल तळ वापरण्यास अमेरिकेला परवानगी

दुसरीकडे, ब्रिटनने ब्रिटिश नौदलाच्या दिएगो गार्सिया आणि आरएएफ फेअरबोर्ड या तळांचा उपयोग होर्मुझमधील क्षेपणास्त्र केंद्रे नष्ट करण्यासाठी अमेरिकेला करण्यास परवानगी दिली आहे. इराणने शुक्रवारी दिएगो गार्शिया या हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त तळावर ४,००० किलोमीटर पल्ल्याच्या दोन टप्प्यांच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इराणकडे या पल्ल्याची क्षमता आहे, हे जगाला पहिल्यांदाच कळले, ज्यामुळे युरोपियन राजधान्याही आता सुरक्षित नसल्याची भीती व्यक्त होत आहे.

एकूणच, या युद्धाने आता केवळ मध्यपूर्वेची नव्हे, तर संपूर्ण जागतिक ऊर्जा, सुरक्षा आणि अणुसंतुलनाची समीकरणे बदलण्यास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...
Skip to content