Thursday, January 23, 2025
Homeडेली पल्स५ महिन्यांत भारताच्या...

५ महिन्यांत भारताच्या आंबा निर्यातीत झाली 19%ने वाढ!

भारताच्या कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा, तसेच वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत आंबा निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली असून निर्यात केलेल्या आंब्यांचे मूल्य 47.98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. गेल्या वर्षीच्या 40.33 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत या वर्षात भारताने आंबा निर्यातीत 19% वाढ नोंदवली आहे. 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व  कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा, यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने गेल्या 2022-23 या आर्थिक वर्षात 48.53 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 22963.78 मेट्रिक टन आंबे निर्यात केले होते. तर चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत 47.98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 27330.02 मेट्रिक टन आंबे निर्यात केले आहेत. 2023 मधील हंगामात आंब्यांची निर्यात वाढवण्याच्या हेतूने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व अपेडा (APEDA) ने अमेरिकेच्या कृषी विभागाच्या पशु व वनस्पती आरोग्य परीक्षण सेवेच्या (APHIS) निरीक्षकांना वाशी, नाशिक, बेंगळुरू व अहमदाबाद येथील इरेडिएशन केंद्रात आमंत्रित केले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023-24 या वर्षात भारताने अमेरिकेला केलेल्या आंबा निर्यातीत 19% वाढ नोंदवली आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच 2043.60 मेट्रिक टन आंबे निर्यात केले आहेत.

केंद्र सरकारच्या संस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताने अमेरिकेसह जपानला 43.08 मेट्रिक टन, न्यूझीलंडला 110.99 मेट्रिक टन, ऑस्ट्रेलियाला 58.42 मेट्रिक टन आणि दक्षिण आफ्रिकेला 4.44 मेट्रिक टन आंब्यांची निर्यात केली आहे. चालू आर्थिक वर्षात आंब्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2023 सालच्या हंगामात भारताने 41 देशांना आंबे निर्यात केले असून त्यात इराण, मॉरिशस आणि नायजेरियासारख्या नव्या बाजारपेठांचा समावेश आहे. 

Continue reading

अजित घोष ट्रॉफी महिला क्रिकेटः साईनाथ स्पोर्ट्सला विजेतेपद

सेजल विश्वकर्मा (६४), श्रावणी पाटील (नाबाद ४७) यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्यात यश आले. त्यांनी यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबचा ३५ धावांनी पराभव केला. सेजल आणि श्रावणीच्या दुसऱ्या विकेटच्या...

पं. कान्हेरे, पं. द्रविड, संजय मोने आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले असून येत्या रविवारी, २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता केंद्रात होणाऱ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. अरुण द्रविड,...

घोष ट्रॉफी क्रिकेटः डॅशिंग आणि स्पोर्टिंग युनियनही उपांत्य फेरीत

गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेतील शेवटच्या दोन साखळी लढतींमध्ये भामा सी. सी.ने डॅशिंगवर २५ धावांनी मात करत गटामध्ये अव्वल...
Skip to content