Homeडेली पल्ससर्वपित्री अमावस्येचे महत्त्व!

सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व!

उद्या म्हणजेच ६ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवले आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व आपण जाणून घेऊया.

पितृपक्षातील अमावस्येला ‘सर्वपित्री अमावस्या’ हे नाव आहे. या तिथीवर कुळातील सर्व पितरांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जाते. वर्षभरात किंवा पितृपक्षातील अन्य तिथींवर श्राद्ध करणे संभव न झाल्यास, या तिथीवर सर्वांसाठी हे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण पितृपक्षातील ही अंतिम तिथी आहे. शास्त्रात सांगितले आहे की, श्राद्धासाठी अमावस्येची तिथी अधिक योग्य तिथी आहे आणि पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे.

सर्वपित्री अमावास्येला घरातील किमान एक तरी ब्राह्मणला भोजनाचे निमंत्रण दिले जाते. या दिवशी मच्छिमार, ठाकूर, बुनकर, कुणबी आदी जातींतील पितरांच्या नावाने भाताचा अथवा पिठाचा पिंड दिला जातो आणि आपल्याच जातीतील काही लोकांना भोजन दिले जाते. यामध्ये या दिवशी ब्राह्मणांना शिधा (अन्न सामुग्री) देण्याची परंपराही प्रचलित आहे.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्राद्ध’

शास्त्रात ज्या कृतींसाठी जो काळ नेमून दिलेला आहे, त्या-त्या काळात त्या कृती करणे आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पितृपक्षातच महालय श्राद्ध करावे. पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याविषयी निरनिराळे पक्ष सांगितले आहेत. सांप्रत मृत व्यक्तीच्या (मृत्यू झालेल्या) तिथीलाच पितृपक्षात एक दिवस महालय श्राद्ध केले जाते. जननाशौच किंवा मरणाशौच (सुवेर-सुतक) किंवा अन्य काही अपरिहार्य कारणामुळे एखाद्याला त्या तिथीला महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सर्वपित्री अमावास्येला करावे. अन्यथा सोयीनुसार कृष्ण पक्षातील अष्टमी, द्वादशी, अमावास्या आणि व्यतीपात योग या दिवशीही महालय श्राद्ध करता येते.

पितृपक्षात जर सूतक पडले तर, मृत व्यक्तीची तिथी जर सूतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू शकतो. जर मृत व्यक्तीची तिथी सूतक असलेल्या दिवसांत असल्यात सर्वपित्री अमावास्याला विधी करू शकतो. यात फक्त मृत व्यक्ती जर आपले आई-वडिल यापैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही. पुढील वर्षी करू शकतो.

– वेदमूर्ती केतन शहाणे

सनातन साधक- पुरोहित पाठशाळा

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कलियुगात कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकालाच आध्यात्मिक त्रास असल्याने, श्राद्ध करण्याच्या जोडीला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजपही अधिकाधिक करावा.

सौजन्य: सनातन संस्था

संपर्क: 9920015949

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content